ICICI Bank कडून FD वरील व्याजदरात वाढ, असे असतील नवीन व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता ICICI Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

ICICI Bank sizzles in muhurat trading post strong Q2 earnings

28 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

28 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. नवीन व्याजदर 5 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. या बदलनंतर, आता बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 3.75% ते 6.25% दराने व्याज देईल. हे लक्षात घ्या कि, ICICI Bank सध्या एक ते तीन वर्षांच्या FD वर सर्वाधिक 6.50% व्याजदर देत आहे.

ICICI Bank stock hits all-time high as market rebounds after two sessions - BusinessToday

नवीन व्याज दर

7 ते 29 दिवसांच्या FD वर 3.75% व्याजदर
30 ते 45 दिवसांच्या FD वर 4.75% व्याजदर
46 दिवस ते 60 दिवसांच्या FD वर 5.00% व्याजदर
61 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 5.25% व्याजदर
91 ते 184 दिवसांच्या FD वर 5.50% व्याजदर
185 ते 270 दिवसांच्या FD वर 5.75% व्याजदर
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.00% व्याजदर
1 वर्ष ते 3 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 6.50% व्याजदर
3 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 6.25% व्याजदर

ICICI Bank ची स्पेशल FD

हे लक्षात घ्या कि, 30 सप्टेंबर रोजी बँकेकडून ‘गोल्डन इयर्स एफडी’ नावाने लाँच केली असून ग्राहकांना 31 ऑक्टोबरपर्यंत त्यामध्ये गुंतवणूक करता येईल. या मर्यादित कालावधीच्या FD मध्ये ग्राहकांना अतिरिक्त व्याज दर मिळेल. तसेच या एफडीचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.10 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. हे व्याज त्यांना आधीच देण्यात येत असलेल्या 0.50 टक्के अतिरिक्त व्याजाच्या वर असेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. ICICI Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा