हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI Bank ने आपल्या कर्जावरील व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. ज्यानंतर आता कर्जावरील व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.60 टक्के झाला आहे.
हे लक्षात घ्या कि, RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर ICICI Bank कडून हा व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी, RBI कडून रेपो दरामध्ये 0.50 टक्के वाढ केली गेली. या दरवाढीनंतर एकूण व्याजदर 4.90 टक्के झाला आहे. इथे हे लक्षात घ्या कि, RBI ने गेल्या महिन्याभरात रेपो दरात दोन वेळा वाढ केली आहे.
या व्याज दर वाढी नंतर आता होम लोन, ऑटो लोन आणि त्यांच्याशी संबंधित मासिक हप्त्यात (EMI) मध्येही वाढ होणार आहे. यानंतर आता बाकीच्या बँकाही लवकरच कर्जदरात वाढ करण्याची शक्यता आहे.
RBI ने काय निर्णय घेतला ???
8 जून रोजी RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने एकमताने रेपो दरात 50 बेसिस पॉंईटसनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. रेपो दर हा एक प्रमुख धोरण दर आहे ज्याद्वारे RBI कडून इतर बँकांना अल्प कालावधीसाठी कर्ज दिले जाते. आता हा दर 4.90 टक्के झाला आहे. ICICI Bank
या कालावधीत, परमनंट डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दरांमध्ये 50 बेसिस पॉंईटसनी (0.50 टक्के) वाढ करण्यात आली आहे. परमनंट डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) दर जो पूर्वी 4.15% होता तो आता 4.65% पर्यंत वाढला आहे आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर आता 5.15% झाला आहे. ICICI Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/loans/personal-loan/personal-loan-interest-rates.page
हे पण वाचा :
RBL Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने FD दरात केला बदल !!!
आता ICICI Bank च्या फिक्स डिपॉझिटवर मिळणार जास्त व्याज, नवीन दर जाणून घ्या
Multibagger Stocks: ‘या’ 4 आयटी स्टॉक्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट रिटर्न !!!
Business ideas : पांढर्या चंदनाची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!
RBL Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने FD दरात केला बदल !!!