हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI कडून गेल्या महिन्यात रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांकडून त्यांच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यास सुरू झाली. आता हळूहळू जवळपास सर्वच बँका एफडीवरील व्याजदर वाढवत आहेत. यावेळी ICICI बँकेनेही आपल्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.
ICICI Bank च्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँकेने FD वरील दर 2 कोटींवरून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. 11 जुलै-2022 पासून हे नवीन दर लागू केले जातील. यावेळी बँकेकडून अनेक कालावधीच्या व्याजदरात वाढ केली गेली आहे. बँक सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.10 टक्के ते 5.75 टक्के व्याजदर देत आहे.
वेगवेगळ्या कालावधीसाठीचे एफडी दर
बँक 7 ते 29 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.10 टक्के व्याजदर देत राहील. तर बँकेने 30 ते 45 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.25 टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. आता बँक 46 दिवस ते 60 दिवस आणि 61 दिवस ते 90 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 3.50 टक्के आणि 4.00 टक्के व्याजदर देत राहील. ICICI Bank 91 दिवस ते 184 दिवसांच्या कालावधीच्या डिपॉझिट्सवर 4.75 टक्के व्याजदर देत राहील. 271 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर बँक आता 5.25% ऐवजी 5.35% व्याज दर देईल.
नवीन आणि रिन्यू होणाऱ्या डिपॉझिट्सवर लागू
ICICI Bank आता एका वर्षात 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्सवर 5.40 टक्क्यांवरून 5.60 टक्के दराने व्याज देईल. बँक आता 18 महिने ते 10 वर्षांच्या डिपॉझिट्सवर 5.70 टक्क्यांपेक्षा 5.75 टक्के व्याजदर देईल. बँकेच्या साइटनुसार, हे सुधारित व्याजदर नवीन ICICI बँकेच्या डिपॉझिट्ससाठी आणि सध्याच्या डिपॉझिट्सचे रिन्यूअल करण्यासाठी लागू होतील.
2 कोटींपेक्षा कमी डिपॉझिट्सच्या व्याजदरात 22 जून रोजी वाढ करण्यात आली होती
ICICI Bank ने 22 जून 2022 रोजी ₹ 2 कोटींपेक्षा कमी कालावधीच्या डिपॉझिट्ससाठीच्या व्याजदरात सुधारणा करण्यात आली होती. बँक आतापर्यंत या डिपॉझिट्सवर देऊ करत असलेला व्याजदर बिगर ज्येष्ठ नागरिकांसाठी 2.75 टक्के ते 5.75 टक्के आणि वृद्धांसाठी 3.25 टक्के ते 6.50 टक्के आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icicibank.com/Personal-Banking/account-deposit/fixed-deposit/fd-interest-rates.page
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, नवीन दर तपासा
पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात : शिंदे – भाजप सरकारची मोठी घोषणा
सर्वसामान्यांच्या धक्का!! ‘या’ जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढणार
BSNL च्या प्रीपेड प्लॅनमध्ये 3 रुपयांत मिळवा 1 GB डेटासहित अनलिमिटेड कॉलिंग !!!