हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बँकेच्या विश्वास घाताचे प्रकार वेगाने वाढत आहेत. जसजसे बँकेचे व्यवहार डिजिटल होत आहेत तसे ग्राहकांना सोपे जात आहे पण सोबतच फ्रॉडचे अनेक प्रकार समोर येत आहेत. काळात या प्रकरणांमध्ये अधिक वाढ झाली आहे. अशा कॉलना वॉयस फिशिंग म्हंटले जाते. हे लोक स्वतःला बँकेचे प्रतिनिधी अथवा तांत्रिक समूहाचे सदस्य म्हणतात. आधी ग्राहकांचा विश्वास संपादित करून घेतात आणि मग त्यांच्या वैयक्तिक माहिती काढून घेतात. हे कॉल कसे ओळखायचे याची माहिती घेऊया.
सध्याच्या काळात पैसे चोरण्यासाठी अनेक प्रकारच्या पद्धतीचा वापर हे लोक करतात असे सायबर सिक्युरिटी सेलचे तज्ञ सांगतात. यामध्ये एटीएम क्लोनिंग, व्हाट्सअप कॉलच्या माध्यमातून खोटे कॉल, कार्डच्या डाटाची चोरी, युपीआय ची चोरी, लॉटरी च्या नावावर चोरी, बँक खात्याच्या संदर्भातील तपासाच्या नावावर चोरी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. बऱ्यापैकी प्रकरणात समोरून बोलणारा माणूस प्रोफेशनल वाटतो. ग्राहकांना फोन करण्यामागे ते ठोस कारण सांगतात. आणि वैयक्तिक तसेच गोपनीय माहिती काढून घेतात. ओटीपी, क्रेडिट कार्ड नंबर, क्रेडिट कार्डचा सीव्हीव्ही, एक्सपायरी डेट, सिक्यूयर पासवर्ड, एटीएम पिन, इंटरनेट लॉग इन आयडी आणि पासवर्ड आणि दुसरी वैयक्तिक माहिती ते लोक मागतात.
या सर्व महत्वपूर्ण माहितीच्या आधारे पीडित व्यक्तीच्या नावावर बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन केले जाते. म्हणूनच बँक अथवा बँकेच्या प्रतिनिधींकडून कॉल आले असता ते अशी वैयक्तिक माहिती विचारत नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. अशा फोन कॉल ना कधीच उत्तर दिले नाही पाहिजे. अशा कॉल च्या संदर्भात नेहमी माहिती दिली पाहिजे. चुकून पासवर्ड दिला तर लगेच पासवर्ड बदलून घ्यावा. आपल्या ओळखीसाठीची माहितीही कधी द्यायची नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.