आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी,शहा अन् फडणवीसांवर कुंचल्यातून फटकारे मारले असते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांसोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधला. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी,शहा अन् फडणवीसांवर कुंचल्यातून फटकारे मारले असते असे राऊत यांनी म्हंटल.

संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी कुंचला हाती ठेवला तेव्हा त्यांच्या हाताला त्रास व्हायचा. एकेकाळी मी कुंचला हाती घेतला की अनेकजण थरथरायचे. तेव्हा सीताराम केसरी, पंडित नेहरू, सरदार पटेल, मोरारजी देसाई असे मॉडेल्स होते. मात्र आता मला प्रेरणा देणारे मॉडल्स दिसत नाहीत असं ते म्हणायचे. आणि त्यांनी कुंचला खाली ठेवला.

त्यानंतर राजकारणात सोनिया गांधी आल्या, नरसिंह राव आले, सीताराम केसरी आले तेव्हा ते म्हणाले, अरे रे मी ही मॉडल्स मिस केली. मी व्यंगचित्रं सोडली आणि माझी मॉडल्स परत आली. त्याचप्रमाणे आज नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस असे मॉडेल्स देशात आहेत. त्यामुळे आज जर बाळासाहेब असते तर त्यांना या सर्वांवर कुंचला हातात घेऊन स्ट्रोक्स… फटकारे नक्कीच मारावेसे वाटले असते, असं राऊत म्हणाले.