पहाटेची सत्ता गेल्यापासून पाण्यात तडफडणाऱ्या माश्याप्रमाणे भाजपची अवस्था; पटोलेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राज्यपालाची भेट घेत महाविकास आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ बरखास्त करावे आणि मंत्र्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जेव्हापासून पहाटेची सत्ता घेली आहे. तेव्हापासून भाजप विचलित झाली आहे. पाण्यात तडफडणाऱ्या माश्याप्रमाणे भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे आता आनियापूर्वीही सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून केली जात असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजपकडून देशाला अडचणीत आणून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं देशाला भोगावं लागत आहे. देश विकला जातोय. भारतमाता की जय म्हणणारी भाजप देश विकत असेल तर भाजपने त्याचे उत्तर द्यावे. मूळ विषयाला डायवर्ट करण्यासाठी भाजपकडून हा प्रयत्न केला जातोय.

जेव्हापासून पहाटेची सत्ता भाजपवाल्यांची गेली आहे. तेव्हापासून हे लोक वारंवार महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी करत आहेत. मात्र, केंद्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आता केंद्रातीलच सरकार बरखास्त करण्याची वेळी आली असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Leave a Comment