जर सोशल मीडिया अकाउंटवर हवी असेल Blue Tick तर द्यावे लागतील 1 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । प्रत्येकाला सोशल मीडियावर एक व्हेरिफाइड अकाउंट (Verified Account) हवे असते. परंतु अकाउंटवर ब्लू टिक कसे घ्यावे याची फारच कमी लोकांना माहिती असते. या निळ्या रंगाच्या टिकसाठी काही कंपन्या युझर्सकडून बरीच रक्कम घेत आहेत. मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारतात Blue Tick साठी तुम्हाला 30,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर Blue Tick मिळाल्यानंतर अकाउंट वेरिफाय होते.

बाजारात अनेक डिजिटल मार्केटींग एजन्सी आहेत
या अहवालानुसार अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये युझर्स साठी वेरिफाइड अकाउंट फीस जास्त आहे. या अहवालानुसार, mpsocial.com, blackhatworld.com आणि swapd.co सारख्या साइटस युझर्सना जास्त किंमतीत Blue Tick देत आहेत. बाजारात अशा अनेक डिजिटल मार्केटींग एजन्सी आहेत ज्या अशा सेवा देतात असंही या अहवालात म्हटलं गेलं आहे.

फॉलोअर्सची संख्या वाढविणारे बूस्टिंग टूल्स
या अहवालात असेही सांगितले गेले आहे की, या एजन्सीज व्हेरिफिकेशनची सर्व्हिस पुरवित आहेत. यासाठी त्यांनी बूस्टिंग टूल्सचा वापर करून सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या वाढवतात. याद्वारे खात्यात किंवा खात्याशी संबंधित पोस्टला बूस्ट केले जाते. कंपन्या यासाठी भरमसाठ फीस आकारतात.

ब्लू टिक म्हणजे व्हेरिफाइड अकाउंट
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर ब्लू टिक असणे हे सूचित करते की सदर अकाउंट बनावट नाही, हे Verified झाले आहे. जर आपल्यालाही ब्लू टिक हवी असेल तर आपले अकाउंट योग्य आणि ऍक्टिव्ह असले पाहिजे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या कंपन्या सामान्यत सरकारी संस्था, कंपन्या, खास लोकं, राजकारणी, अभिनेते, व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, न्यूज कंपन्या आणि राजकारणी यांनाच ब्लू टिक देतात किंवा त्यांचे अकाउंट व्हेरिफाइड करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.