औरंगाबाद । भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते, असा टोला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी सरकार पडणार, असं बोलावं लागतं. आणखी काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. ते गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आणखी काही भाजप नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागतील, असा दावा केला जात आहे. दरम्यान, आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले होते.
बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक: उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस! हे उमेदवार रिंगणात
वाचा सविस्तर-👉 https://t.co/EypRymMRmg#HelloMaharashtra #politics #politicalnews— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 12, 2020
बिहार विजयानंतर भाजपचे हौसले बुलंद! राज्यात पुन्हा 'ऑपरेशन लोट्स'ची चर्चा
वाचा सविस्तर- 👉 https://t.co/dkqwWUF6oS@Dev_Fadnavis #BiharElectionResults2020 #BiharWithNDA #HelloMaharashtra @BJP4Maharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 12, 2020
हुर्ररे! आता रब्बी हंगामात सिंचनासाठी दिवसाही वीजपुरवठा होणार; उर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
वाचा सविस्तर-👉 https://t.co/gBI6cB6dkq@NitinRaut_INC #electric #Farmers #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 12, 2020
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in