“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”- प्रकाश आंबेडकर

1
33
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना प्रतिनिधी । “या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी घनसांगवीत बोलतांना केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालना जिल्ह्यातील घनसावंगी मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘भाजप घराणेशाही विरोधात बोलतात परंतु त्यांच्या येथेही घराणेशाही आहे. उमेदवारांना दुसऱ्याच्या बॅग उचलण्याच्या पलीकडे दुसरा मार्गच नाही.’ ना सन्मान, ना मान, ना सत्ता आणि म्हणून महाराष्ट्राची निवडणूक अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं आंबेडकर यांनी सांगितल. आम्ही सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. पण यावेळेस मात्र, उमेदवारी मिळाली, संघटन मिळाले आणि मदतही मिळाली त्यामुळे आता संधीचं सोनं करण्याची वेळ आली असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.

इथली दृष्टी बदलायची असेल तर ही निवडणूक महत्वाची आहे, जे सगळे उमेदवार आम्ही उभे केले, ती माणसं आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी वंचितला निवडून देण्याचं आवाहन केलं. तसेच, ‘हे सरकार घालविलं नाही, तर मोदी तुम्हाला १५ लाख रुपये तर देणार नाहीच, उलट तुमच्या बँकेत जेवढे पैसे आहेत त्यापैकी ९० टक्के घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केली.

1 COMMENT

  1. अरे सत्ता सोड तुझ्या किती उमेदवारांची ‌डीपॉझिट जपत होईल ते तरी ठाऊक आहे का,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here