मुंबई | सुरुवातीच्या काळात लॉक डाऊन केला नसता तर कदाचित आज आपली अवस्था न्यूयॉर्कसारखी झाली असती. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत शरद पवार यांनी लॉकडाउन बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
आपण दररोज न्युज पाहतो त्यामध्ये न्यूयॉर्कची अवस्था आणि तेथे झालले मृत्यू अगदी भीषण आहेत. सुरुवातीला ठाकरे सरकारने कठोरपणाने पाऊले उचलत लॉकडाउन आणि त्याची अंबलबजावणी केली. त्यामुळे न्यूयॉर्क सारखी आपली अवस्था झाली नाही. तेथे हजारो लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. कठोरपणे केलेला लॉकडाउन आणि लोकांचे सहकार्य यामुळे आपली परिस्थिती सुधारायला मदत झाली. पहिले दोन अडीच महिने लॉक डाउन गरजेचाच होता. आणि त्याबद्धल ठाकरे सरकारचा दृष्टिकोन शंभर टक्के बरोबर होता असंही पवार यांनी म्हटले आहे.
काही जणांना सरकारने घेतलेला निर्णय उशिरा घेतला असे वाटले. पण मला असं ठाकरे सरकारने निर्णय घ्यायला उशीर झाला असे वाटन नाही असं सांगितले. त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि तो त्यांच्या स्वभावाला साजेसा होता. निर्णय घ्यायचा पण अत्यंत सावधगिरीने त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेता येईल तितकी घ्यायची. मग पाऊल टाकायचे. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे. या शब्दात त्यांनी ठाकरे सरकारचे कौतुक केले.
काही दिवसांपूर्वी तज्ञाशी माझं बोलणं झालं, त्यांनी साधारण असं सांगितलं कि, जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या खाली जाईल. आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पूर्ण खाली जाऊन नॉर्मलसी येईल. पण याचा अर्थ कोरोना पूर्णतः संपला असा नव्हे. यापुढे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. लॉक डाउन मुळे आर्थिक नुकसान खूप झाले आहे. यापुढे अशी परिस्थिती येऊ नये अशी पार्थना आहे. अशी वेळ आलीच तर आपली तयारी असली पाहिजे. मला विश्वास आहे कि हे सरकार या संकटावर मात करण्यात नक्की यशस्वी होईल असेही पवार साहेब म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.