थोडी तरी लाज असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी : पी. चिदंबरम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. एकीकडे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. केंद्र सरकारच्या अपयशाबाबत काँग्रेसकडून चांगलाच हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. ‘थोडी जरी लाज शिल्लक असेल तर आता केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी चिदंबरम यांनी केली आहे. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री यांनीही राजीनामा द्यावा, असे सांगितलं आहे.

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे झालेल्या मृत्यूला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे आता विविध राजकीय पक्षातील नेत्यांकडून आरोप केले जाताहेत. वेळीच जर उपाययोजना केल्या असत्या तर कोरोनाचा प्रसार झाला नसता, असंही म्हंटल आहे. या कोरोनाच्या वाढत्या मृत्यूच्या प्रमाणावरून आता काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम आक्रमक झाले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी केली आहे. तर देशाचे केंद्र सरकारने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांकडून आता आरोप केले जात असून तसेच भाजपमधील नेत्यांची राजीनाम्याची मागणी केली जात कसूनही त्यास भाजपकडून काहीच प्रतिउत्तर देण्यात आलेले नाही. जेष्ठ नेते चिदंबरम यांनी केंद्र सरकारकडे माफी मागावी अशी मागणी केली असून केंद्राला सल्लाही दिला आहे. त्यामध्ये ‘या कोरोनाच्या मोठ्या महामारीच्या काळात आता लढण्याचं काम एका खंबीर टीमवर व प्रधानमंत्री मोदी यांच्यावर सोडून द्यावं. केंद्र सरकारने आता आरोग्यमंत्री व डॉकटर, सलाला देणाऱ्या टीमला जास्त स्थान देऊ नये,’ असही सल्ला चिदंबरम यांनी दिला आहे.

Leave a Comment