मूल दत्तक घ्यायचा विचार करत असाल तर, ही दिलासादायक बातमी तुमच्यासाठी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | आपण एखादे मूल दत्तक घ्यायचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. देशभरामध्ये मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्यात आली आहे. बुधवारी केंद्र सरकारने जुवेनैल जस्टिस ॲक्ट 2015 च्या नव्या सुधारण्याला मंजुरी दिली आहे. यानुसार आता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन अर्ज करून जिल्हा पातळीवर राबविण्यात येणार आहे. तसेच दत्तक घेण्याच्या प्रक्रियेचा कालावधीही निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सोपी तसेच कमी कालावधीमध्ये होणार आहे.

नवीन सुधारणे नुसार ही प्रक्रिया जिल्ह्यामध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पातळीवर पार पाडतील. बालकांना दत्तक घेण्यासाठी देशभरामध्ये लाखो लोकांची प्रतीक्षा यादी आहे. मात्र दत्तक घेण्यासाठी अनेक कायदेशीर बाबींचा सामना करावा लागत होता. कायदेशीर बाबी वगळून मूल दत्तक घेतल्यास त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे दत्तक प्रक्रिया किचकट बनली होती.

मूल दत्तक घेण्याचा विचार करणाऱ्या लोकांना प्रथम सेंट्रल अडपटेशन रिसोर्स अथॉरिटी (CARA)च्या वेबसाईटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कारा उपलब्धतेच्या आधारावर मिरीट लिस्ट तयार करते. आणि अनाथालययामध्ये असलेल्या मुलांच्या उपलब्धतेनुसार गरजू जोडप्यांना मूल दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यासाठी अनेक सर्टिफिकेट लागतात. सोबतच मूल दत्तक घेण्यासाठी काही अटी आहेत. त्या म्हणजे, दाम्पत्याचे वय 45 वर्षापेक्षा अधिक असता कामा नये. चार ते आठ वर्षापर्यंतचे मुल हेच 100 वर्षापर्यंतचे दांपत्य दत्तक घेऊ शकते. अर्जासोबत उत्पन्नाचे सर्टिफिकेट आहे द्यावे लागेल. दांपत्याचा घटस्फोट झाला असल्यास त्याचे प्रमाणपत्र.

पती-पत्नी पैकी कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्या संबंधातील प्रमाणपत्र. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दाम्पत्यांना मूल दत्तक दिले जात नाही. एकही मुल नसणाऱ्या दाम्पत्यांना दत्तक प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाते. कोणतेही कोणताही गंभीर रोग नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. मूल दत्तक दिल्यानंतर दहा वर्षापर्यंत त्या घराचा दौरा करून त्यासंदर्भात फॉलोअप रिपोर्ट तयार केला जाऊन त्यावरती निरीक्षण केले जातात. एकंदरीत संबंधित प्रक्रिया पूर्णपणे निरीक्षण करून आणि सर्व बाबींचा विचार करून केली जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment