हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकांच्या चित्रीकरणाच्या सेटवर ६० वर्षांवरील कलाकारांना परवानगी नाही. राज्य सरकारच्या या निर्णयावर अभिनेते विक्रम गोखले चांगलेच संतापले आहेत. कलाकारांसाठी असा कायदा असेल तर मग ६० वर्षांवरील नेत्यांनी आपले राजीनामे द्यावेत. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असे विक्रम गोखले यांनी म्हटले.
मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काही दिवसांपूर्वीच मालिकांच्या चित्रीकरणाला अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. त्यामध्ये शुटिंगच्या सेटवर ६० वर्षांवरील अधिक वयाचे कलाकार असू नये, असाही नियम होता. त्यामुळे मालिकेतील ज्येष्ठ कलाकार आणि निर्मात्यांची चांगलीच गोची झाली होती.
यानंतर मनोरंजनसृष्टीकडून ६५ वर्षांवरील कलाकारांनाही चित्रीकरणासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु सरकारने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नाही. परंतु, या निर्णयामुळे ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. ६५ वर्षांवरील कलाकार शुटिंगच्या सेटवर आपली काळजी घेतील. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना सेटवर जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in