मुंबईला मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, समुद्राला उधाण येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पुढील ४८ तासाच मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईत ३ आणि ४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय उत्तर भारतातीलही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण भागात चांगला पाऊस पडत आहे. मात्र, सध्या राज्यात पावसाची उघडीप आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. दिवसा पासून कमी आणि रात्री पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासून कोकणात पावसाला जोर दिसून येत आहे. येत्या ४ जुलै ते २४ जुलै दरम्यानचे आठ दिवस समुद्र खवळेल्या दिसून येईल. या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दिवसांत मुंबईच्या समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

जुलैमध्ये मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. समुद्राला भरती असताना मुंबईत अतिवृष्टी झाल्यास समुद्रात जाणारं पाणी थांबल्याने ते तुंबण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरती आणि जोरदार पाऊस या पार्श्वभूमीवर पालिकेनेही आपली आपत्कालीन यंत्रणा सक्षम केली असून चौपाट्यांसह, १० केंद्रांवर आवश्यक साधन सामग्रीसह जवान तैनात ठेवले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment