विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करणे पडले महागात 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागला की त्याला माणसांच्या गर्दीत सोडायचे आणि हे करतानाचे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे एका इसमाला महागात पडले आहे. या स्टंटचे बक्षीस म्हणून त्याला वन्य जीवाचा खेळ केल्याप्रकरणी वन्य कोठडी भोगावी लागणार आहे.  फेसबुकवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अल्ताफ कलावंत या संशयित इसमावर ही  वेळ आली आहे. वन्य जीव कायदा १९७२ अंतर्गत कलम ३९, ४०, ४२, ४३ नुसार या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

कोल्हापूरमधील इचलकरंजी शहरात या इसमाला अटक झाली आहे. त्याला तीन दिवस वन्य कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गेल्या काही दिवसापासून एक व्यक्ती नागपकडून त्याच्या सोबत दंगा मस्ती करीत होता. तो नाग डंख मारू लागताच त्याला उचलून गर्दीच्या ठिकाणी फेकत होता. अशा धक्कादायक प्रकारची काही छायाचित्रे, व्हीडीओ सोशल मीडियावर प्रसारीत झाले होते. त्याची माहिती वनविभागाला मिळताच माहिती सहाय्यक वनसंरक्षक तंत्रज्ञानाव्दारे शोध घेऊन कोल्हापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या तरूणाला इचलकरंजीत सकाळी अटक केली. त्याच्याकडे चौकशी करताना साप पकडण्याची काठी, मोबाईल फोटो व्हिडीओ असे साहित्य मिळून आले. या तरूणाचे अन्य कोणी साथीदार आहेत, त्याने आत्ता पर्यंत किती साप पकडले, त्याचे पुढे काय केले. तस्करी झाली का विष काढले का? आदी बाबत माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

सहाय्यक उपवनसंरक्षक सुनिल निकम यांनी सांगितले की, “वन्यजीवांना पकडून त्यांचा खेळ करणे किंवा त्यांना इजा पोहचेल असे कृत्य करणे वन्यजीव कायद्याचे उल्लंघन आहे. अशा व्यक्ती विरोधात वन्यजीव कायद्या अन्वये गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच वन्यजीव कुठे आढळल्यास त्याची माहिती वनविभागाला देणे अपेक्षीत आहे. वन्यजीवाला इजा पोहचविल्यास अन्न साखळी धोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे वन्यजीवांशी खेळणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर या पुढेही कारवाई सुरू रहाणार आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment