नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. SBI ने आपल्या सेवेसंबंधी (SBI Important Notice) ट्विट करुन माहिती दिली आहे. SBI ने ट्वीट केले आहे की, मेंटनन्स अॅक्टिव्हिटीमुळे या वेळी 21 मे ते 23 मे या कालावधीत बँकेच्या काही सेवा बंद राहतील. SBI चे म्हणणे आहे की,’ ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंगचा अनुभव देण्यासाठी सेवा सुधारण्यासाठी मेंटनन्सचे काम केले जात आहे.’
We request our esteemed customers to bear with us as we strive to provide a better banking experience.#SBI #StateBankOfIndia #ImportantNotice #InternetBanking #OnlineSBI pic.twitter.com/LNMnKjORMR
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 20, 2021
स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वपूर्ण नोटिस अंतर्गत ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. बँकेने सांगितले की,” 21 मे रोजी सकाळी 10: 45 ते दुपारी 22 मे या कालावधीत बँक मेंटनन्ससाठी दुपारी 1:15 आणि 23 मे 2021 रोजी सकाळी 02.40 ते 06.10 दरम्यान काम करेल.” बँकेने म्हटले आहे की,” यावेळी SBI ग्राहकांना INB/YONO/YONO Lite/UPI सर्व्हिसेस वापरता येणार नाहीत.”
SBI ने दिलेल्या माहितीनुसार, बँक आज आपले UPI प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल, जेणेकरुन ग्राहकांचा अनुभव सुधारू शकेल. यावेळी, ग्राहकांसाठी UPI ट्रान्सझॅक्शन बंद असतील.
31 मेपूर्वी करावा लागणार केवायसी अपडेट
SBI ने केवायसी अपडेट 31 मे पर्यंत वाढवून आपल्या कोट्यावधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँक म्हणते की केवायसीसाठी ग्राहकांना बँकेत येण्याची गरज नाही. कोरोना साथीच्या दुसर्या लाटेमुळे अनेक राज्यात स्थानिक पातळीवर लॉकडाउन लागू केले जात आहे. अशा परिस्थितीत ग्राहक आता केवायसी डाक्यूमेंट (KYC Documents) पोस्ट किंवा ईमेलद्वारे सादर करू शकतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा