व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

PNB ने बदलले पैशांच्या व्यवहारासंदर्भातील ‘हे’ नियम, 1 एप्रिलपासून लागू होणार

नवी दिल्ली । देशातील दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या खातेदारांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, बँकेने 31 मार्चपर्यंत जुना आयएफएससी कोड (IFSC) आणि एमआयआरसी कोड (MICR) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे न केल्यास, ग्राहक ऑनलाइन पद्धतीने पैशाचे व्यवहार करू शकणार नाहीत. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.

बँकेने आपल्या सर्व खातेदारांना जुना आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड बदलण्याचे आवाहन केले आहे. तसे न झाल्यास जुना कोड असलेले खातेधारक 31 मार्च 2021 पासून पैशांचे व्यवहार करू शकणार नाहीत.

या दोन बँका पीएनबीमध्ये विलीन झाल्या
केंद्र सरकारने गेल्या वर्षी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण केले. त्यानंतर या बँकांच्या ग्राहकांना आता नवीन चेकबुक तसेच आयएफएससी आणि एमआयसीआर कोड घेण्यास सांगण्यात आले आहे.

ओबीसी आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनी 31 मार्चपूर्वी जुने चेकबुक तसेच आयएफएससी आणि एमआयसीआर कोड घ्यावा, असे बँकेने ट्विट केले आहे.

या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपण माहिती मिळवू शकता
बँकेने आपल्या ट्विटमध्ये एक टोल फ्री नंबरही शेअर केला आहे. विलीनीकरणानंतर पीएनबीमध्ये रुजू झालेल्या दोन्ही बँकांच्या ग्राहकांना आता नवीन चेकबुक आणि नवीन आयएफएससी कोड मिळवावा लागेल, असे बँकेने म्हटले आहे. या संदर्भातील कोणत्याही माहितीसाठी आपण बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर 18001802222/18001032222 वर देखील कॉल करू शकता. 1 एप्रिलपासून जुन्या चेकबुक आणि जुन्या आयएफएससी कोड काम करणार नाहीत असे बँकेने ग्राहकांना सांगितले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.