सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरातील एसटी बसस्थानकांच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पारंगे चाैकात एका रूग्णवाहीकेने दोन जणांना जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून रूग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील पारंगे चाैकात ॲम्बुलन्सने क्रमांक (एम एच-20 डब्लू- 9796) दुचाकीला जवळपास 50 फूट फरफटत नेले. घटनेत रूग्णवाहिकेची समोरील काच पूर्णपणे चक्काचूर झालेली आहे. तसेच ॲम्बुलन्स चालकही जखमी झाला आहे, मात्र तो ॲम्बुलन्स सोडून पळून गेला असल्याची माहिती मिळात आहे.
दुचाकी वाहनधारक दोघांनाही तात्काळ सिविल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिस घटनेची अधिक माहीती घेत असून रूग्णवाहिका चालकांची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा