महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपलेत? ; भाई जगतापांचा पडळकरांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील भाजचे आमदार गोपीचंद पडळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पत्र लिहून निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसनेते भाई जगताप यांनी पडळकरांवर टीका केली आहे. “राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे…केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत?” असा सवाल जगताप यांनी विचारला आहे.

पंढरपूर येथील पोट निवडणुकीत विजय प्राप्त केलेले भाजचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून महाविकार आघाडी सरकारवर वारंवार टीकास्त्र डागले जात आहे. राज्यातील करणाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आक्रमक पवित्र घेत भाजप आमदार पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

 

गोपीचंद पडळकरांनी काही दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री पवार याना पत्र लिहले होते. त्या पत्रात ते म्हणाले होते कि, “ज्या राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण देण्याचे काम केले. त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. आरक्षण येथील शोषित आणि मागासलेल्या समाजासाठी न्यायाचा आधार आहे. बहुजनांच्या हिताच्या बाबतीत आपले सरकार सतत गळचेपीचे धोरण राबवत आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेण्याचा कोणताच नैतिक अधिकार महाविकास आघाडीला आता राहिलेला नाही.

Leave a Comment