पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील अटल सेतूचे उद्घाटन!! या वाहनांना प्रवासासाठी असेल बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिक दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतूचे उद्घाटन केले आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. आज पंतप्रधान मोदींनी या सेतूचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला आहे.

मुंबईत उभारण्यात आलेल्या ट्रान्स हार्बर लिंकला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. खरे तर, या सेतूच्या कामाची सुरुवात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना झाली होती. त्यामुळे या दोन्ही मंत्रांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा होता. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी तब्बल 18000 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. महत्वाचे म्हणजे, या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि इतर विविध शहरांमधील अंतर फक्त वीस मिनिटांमध्ये कापता येणार आहे.

या वाहनांना प्रवासासाठी बंदी

आजपासून हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी काही वाहनांना यावर बंदी असणार आहे. जी अवजड वाहने असतील म्हणेजच दुचाकी, ट्रॅक्टर, रिक्षा यांना सेतूवरून प्रवास करत आहे येणार नाही. या वाहनांना पुढे जाण्यासाठी मुंबई पोर्ट-शिवरी या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, झपाट्याने मुंबईच्या लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. याचा त्रास प्रवाशांना देखील होत आहे. यामुळेच यावर तोडगा काढण्यासाठी आणि प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूची बांधण्यात आला आहे.