हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उदघाटन सोहळा पार पडला. धार्मिक विधी करत नव्या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गणपती होम देखील करण्यात आला. मोदींनी आपल्या ट्विटर हॅन्डल वर संसदेच्या उदघाटन सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
आपल्या ट्विट मध्ये मोदी यांनी म्हंटल कि, आजचा दिवस आपल्या सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. संसदेची नवीन इमारत आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही दिव्य आणि भव्य इमारत लोकांच्या सक्षमीकरणासोबतच देशाच्या समृद्धी आणि सामर्थ्याला नवी गती आणि बळ देईल.
आज का दिन हम सभी देशवासियों के लिए अविस्मरणीय है। संसद का नया भवन हम सभी को गर्व और उम्मीदों से भर देने वाला है। मुझे पूर्ण विश्वास है कि यह दिव्य और भव्य इमारत जन-जन के सशक्तिकरण के साथ ही, राष्ट्र की समृद्धि और सामर्थ्य को नई गति और शक्ति प्रदान करेगी। pic.twitter.com/aOReN4JiF4
— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2023
दरम्यान, आज संसदेच्या उदघाटनवेलई नरेंद्र मोदींनी ‘सत्ता हस्तांतरण चं प्रतीक’ सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या उजव्या बाजूला स्थापित केला. सर्व धर्मीयांच्या प्रथा परंपरांप्रमाणे पूजा करत सेंगोलची स्थापना करण्यात आली. यावेळी मोदी सेंगोलसमोर नतमस्तक झाले.
नवे संसद भवन त्रिकोणी आकाराचे असून त्या ४ मजली इमारतीचं क्षेत्रफळ ६४ हजार ५०० वर्ग मीटर इतकं आहे. या संसद भवनाला एकूण ३ प्रवेश द्वारं आहेत. त्यांची नवे ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी आहेत. टाटा प्रोजेक्टस लिमिटेडकडून नव्या संसद भवन बांधण्यात आलं आहे.