मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज पार पडलेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विनने (R Ashwin) महत्त्वाची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केले. त्याच्या या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून बांगलादेश विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली. आर अश्विनने (R Ashwin) त्याच्या या खेळीसह 34 वर्षे जुना विक्रमदेखील मोडला आहे. 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोठी धावसंख्या उभारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. आर अश्विनने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात नाबाद 42 धावा केल्या आहेत.
आर अश्विनने (R Ashwin) कसोटीत यशस्वी पाठलाग करताना 9 व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर नोंदवला. याआधी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 40 धावांची खेळी केली होती. अश्विनने त्याच्यापेक्षा दोन धावा जास्त करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजार धावा आणि 400 पेक्षा जास्त विकेट घेण्याची अष्टपैलू कामगिरी केली आहे.
आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यर यांच्यात 8 व्या गड्यासाठी चौथ्या डावात 71 धावांची भागिदारी झाली. अय्यर आणि अश्विन यांची ही भागिदारी भारताकडून चौथ्या डावात 8 व्या गड्यासाठी झालेली मोठी भागिदारी ठरली आहे. याआधी 1932 मध्ये भारताच्या लाला अमर सिंह आणि लाल सिंह यांनी इंग्लंडविरुद्ध 74 धावा केल्या होत्या. विषेश म्हणजे भारताचा तो पहिलाच सामना होता.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय