मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना काल खेळवण्यात आला. कोरोना झाल्यामुळे पाचव्या कसोटीला मुकणाऱ्या रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यातून पुनरागमन केले आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णवेळ हाती घेतल्यानंतर परदेशातील ही रोहितची (Rohit Sharma) पहिलीच मालिका आहे. इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर इंग्लंडही नवा कर्णधार जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळत आहे. कालच्या सामन्यात नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करून रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
#TeamIndia skipper @ImRo45 smashed the first boundary of the match 🏏 #ENGvIND pic.twitter.com/LWd43LHgkM
— Doordarshan Sports (@ddsportschannel) July 7, 2022
2014 नंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये ट्वेंटी-20 मालिका हरलेला नाही. 2017 व 2018 मध्ये भारताने 2-1 अशा फरकाने, तर 2021 मध्ये 3-2 अशा फरकाने मालिका जिंकली आहे. 2014 मध्ये भारताला 0-1 अशी हार मानावी लागली, तर 2012 मध्ये 1-1असा बरोबरीचा निकाल लागला होता. भारतीय संघाने पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्षदीप सिंग याला या सामन्यात पदार्पणाची संधी दिली आहे. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) स्वतः अर्षदीपला पदार्पणाची कॅप दिली.
रोहितने (Rohit Sharma) कालच्या सामन्यात नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली. इतके दिवस क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याचे हात शिवशिवत असल्याचे त्याचे फटके पाहून जाणवत होते. सॅम कुरनच्या पहिल्याच षटकात त्याने 9 धावा चोपल्या. त्यानंतर रिसे टोपलेला फटकावले. जोस बटलर याने तिसऱ्या षटकात मोईन अलीला आणले आणि त्यालाही रोहितने (Rohit Sharma) सलग दोन चौकार खेचले.पण, अलीने त्याची विकेट घेतली. 14 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने तो 24 धावा करून बाद झाला. रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त कर्णधार म्हणून 1000 धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीने 30 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला होता. तर रोहितने 29 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करत विराटचा विक्रम मोडला आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक जलद 1000 धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा बाबर आजम हा अव्व्ल स्थानावर आहे. त्याने 26 डावांत हा टप्पा पार केला आहे.
हे पण वाचा :
‘या’ Apps द्वारे करता येते Android फोन युझर्सची हेरगिरी !!!
कर्नाटकात ‘सरल वास्तु’ फेम चंद्रशेखर गुरुजींची हत्या, घटना CCTVमध्ये कैद
Maruti कडून भारतात लॉन्च केली जाणार 5 डोअर व्हर्जन एसयूव्ही !!!
कोचिंग क्लासमधील शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण
Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!