मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) येत्या 1 जुलैपासून कसोटी सामन्याला (IND vs ENG) सुरुवात होणार आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे रद्द झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. या कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या कसोटीसाठी रविचंद्रन अश्विन वगळता बाकी सगळे खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. अश्विनला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो इंग्लंडला पोहोचू शकलेला नाही. तो सध्या क्वारंटाइन आहे.
बोर्डाने काय म्हटलय?
“कोरोनाची लागण झाल्यामुळे अश्विन इंग्लंड दौऱ्यावर (IND vs ENG) जाऊ शकलेला नाही. तो वेळेवर बरा होईल व 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी (IND vs ENG) सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी अपेक्षा आहे” असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे. अश्विन सराव सामन्याला मुकू शकतो. कसोटी सामन्याआधी (IND vs ENG) भारत लिसेस्टशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. तेव्हा अश्विन या संघाचा भाग होता.
अश्विन महत्त्वाचा का?
अश्विनशिवाय संघातील अन्य खेळाडू यूके मध्ये पोहोचले असून ते जोरदार सराव करत आहेत. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टीम इंडियाच्या नेट सेशनचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. परदेश दौऱ्यांमध्ये अश्विन भारतीय संघाचा भरवशाचा फिरकी गोलंदाज आहे. तसेच त्याने आपल्या फलंदाजीच्या बळावर अनेकदा संघाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे एजबॅस्टन कसोटीत (IND vs ENG) त्याचे खेळणे संघासाठी खुप महत्वाचे आहे.
हे पण वाचा :
राजकीय भूकंप : शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई नाॅटरिचेबल
कर्नाटकात सोने चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीला धुळे पोलिसांकडून अटक
ठाकरे सरकार अडचणीत?? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये
राजकीय भूकंप : कोरेगावचे आ. महेश शिंदे गुजरातमध्ये?
Commonwealth Games साठी पुरूष हॉकी टीम जाहीर; मनप्रीत सिंहकडे देण्यात आले कर्णधारपद