पुणे : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे गावात सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला होता. यावेळी आरोपीने कोणताच पुरावा मागे सोडला नव्हता. या खुनाचा उलघडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुजित जगताप असे आहे. त्याच्या चुलत भावानेच त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट
सविस्तर माहिती अशी कि, सहा महिन्यांपूर्वी इंदापूर लातुक्यातील शेटफळगडे गावात सुजित जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या खुनाचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. हा खून करताना आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. मात्र तरीदेखील पोलिसांनी या प्रकरणाचा उलघडा केला आहे. या हत्येमागे मृत तरुणाच्या चुलत भावाचा हात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी किशोर जगताप याला अटक करण्यात आली आहे. त्याने मृत सुजित जगतापची हत्या का केली याचे कारण अजूनही समोर आले नाही.
यापूर्वीही आरोपीची केली होती चौकशी
या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच पोलिसांना मृताचा चुलत भाऊ किशोर जगताप याच्यावर संशय होता. त्याला चौकशीसाठी अनेकदा पोलिसांनी ताब्यात देखील घेतले होते. मात्र त्यावेळी पोलिसांना त्याच्याकडून काही ठोस माहिती मिळाली नव्हती. मात्र आता पोलिसांनी सखोल तपास करून आरोपी किशोर जगताप याला अटक केली आहे.