नवी दिल्ली । दूरसंचार कंपनी एरिक्सनने (Ericsson) एका अहवालात दावा केला आहे की, सन 2026 पर्यंत जगभरात 3.5 अब्ज 5G कनेक्शन होतील, तर भारतात त्यांची संख्या जवळपास 35 कोटी असेल. एरिक्सनच्या नेटवर्क सोल्यूशन्स (दक्षिण-पूर्व आशिया, ओशिनिया आणि भारत) चे प्रमुख नितीन बन्सल (Nitin Bansal) म्हणतात की, पुढच्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात स्पेक्ट्रमचा लिलाव झाला तर 2021 मध्ये भारताला पहिले 5 जी कनेक्शन मिळू शकेल. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट 2020 नुसार जगभरातील एक अब्ज लोकांकडे 5G कनेक्शन असेल जे जगभरातील एकूण लोकसंख्येच्या 15% असेल.
अहवालानुसार, जगातील 60 टक्के लोकसंख्या 2026 पर्यंत 5G सेवांमध्ये प्रवेश करेल आणि तोपर्यंत 5G ग्राहकांची संख्या वाढून 3.5 अब्ज होण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत, भारतात 5G ग्राहकांची संख्या 35 कोटींपेक्षा जास्त होईल, जे एकूण मोबाइल युझर्स पैकी 27 टक्के असेल.
2021 पर्यंत भारताला मिळू शकेल पहिले 5G कनेक्शन
बन्सल म्हणाले की, 5G सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलावाची जाहीर केलेली अंतिम मुदतीनुसार 2021 मध्ये भारताला पहिले 5G कनेक्शन मिळू शकेल. या अहवालानुसार, भारतात दरमहा प्रति स्मार्टफोन युझर्सची ट्रॅफिक 15.7 GB आहे, जी जगातील सर्वाधिक आहे. 2020 मध्ये 4G हे भारतातील प्रबळ तंत्रज्ञान असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे. एकूण मोबाइल सब्सक्रिप्शंस पैकी 63 टक्के 4G आहेत. 3G 2026 पर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे.
भारतात मंथली वापरामध्ये वाढ
या अहवालात असे म्हटले गेले आहे की, 2020 मध्ये भारतात स्मार्टफोन सब्सक्रिप्शन वाढून 76 कोटी झाली आहे. ते 2026 पर्यंत 7 टक्क्यांच्या सीएजीआरवरून सुमारे 1.2 अब्जपर्यंत पोचतील अशी अपेक्षा आहे. मोबाईल ब्रॉडबँड सेवा, स्वस्त स्मार्टफोन आणि लोकांकडून ऑनलाइन खर्च केलेला जास्त वेळ यामुळे मंथली वापर वाढत आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.