हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India vs Pakistan : 28 ऑगस्ट रोजी आशिया कप 2022 सुरु होणार आहे. यावेळी आशिया कपची सुरुवात भारत आणि पाकिस्तान मधील सामन्याने होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील क्रिकेटचा इतिहास विस्तृत आहे. राजकीय तणावामुळे या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका गेल्या काही काळापासून थांबवण्यात आलेल्या आहेत. मात्र आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी खेळतात. या दोन्ही संघांदरम्यान याआधी अनेकदा रोमांचक सामने झाल्याचे पहायला मिळाले आहे. आयसीसी स्पर्धेमध्ये भारत नेहमीच पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरला आहे. मात्र असे असले तरीही एकूण विजयाच्या बाबतीत पाकिस्तान हा टीम इंडियाच्या पुढेच आहे. India vs Pakistan
भारत-पाकिस्तान यांच्यामधील सामन्याची जेव्हा जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा तेव्हा चेतन शर्मा आणि जावेद मियांदाद यांची नावं आठवली जातात. चेतन शर्माच्या चेंडूवर जावेद मियांदादने मारलेला षटकार आजही करोडो भारतीयांना सतावतो आहे. हे लक्षात घ्या कि,18 एप्रिल 1986 रोजी ऑस्ट्रेलेशिया कपच्या अंतिम सामन्यात मियांदादने शर्माच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्यावेळी कपिल देव भारतीय संघाचा कर्णधार होता. स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात 36 वर्षांपूर्वी खेळलेल्या या अंतिम सामन्याचा उल्लेख कपिल देव यांनी केला. यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमही सहभागी झाला होता. मियांदादच्या या षटकारामुळे पाकिस्तानी संघाचा भारतीय क्रिकेटवरचा दबदबा पुढील काही वर्षे टिकून राहिला. India vs Pakistan
या सामन्याविषयी वसीम अक्रमने सांगितले कि, या सामन्यात टीम इंडियाला फक्त 245 धावाच करता आल्या. यावेळी भारताचे सलामीवीर सुनील गावस्करने 92, के श्रीकांतने 75 तर दिलीप वेंगसरकरने 50 धावा केल्या. तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानने दोन विकेट घेतल्या. यानंतर टीम इंडियाने जोरदार गोलंदाजी करत पाकिस्तानला 9 विकेट्स 241 धावांवरच अडकवले. मात्र एकीकडे विकेट्स पडत असताना दुसऱ्या टोकाला जावेद मियांदाद खंबीरपणे उभा होता. पाकिस्तानने 49.5 षटकात 242 धावा केल्या होत्या. यावेळी त्यांना विजयासाठी शेवटच्या चेंडूवर चार धावांची गरज होती. India vs Pakistan
यावेळी माजी कर्णधार कपिल देव यांनी सांगितले कि, “जेव्हा शेवटचे षटक आले तेव्हा आम्ही चेतनकडे गेलो. मला अजूनही वाटते की यात त्याची काहीही चूक नव्हती. त्यांना शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती आणि आम्ही ठरवले की तो लो यॉर्कर असेल. दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने सर्वतोपरी प्रयत्न केले, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. तो लो फुल टॉस निघाला. मियांदादने बॅकफूट राखून फटकेबाजी केली. आजही या प्रसंगाची आठवण आल्यावर झोप येत नाही. त्या पराभवाने संपूर्ण संघाचा आत्मविश्वास पुढील चार वर्ष ढासळला. या घटनेनंन्तर कमबॅक करणे खूप अवघड होतं.” India vs Pakistan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icccricketschedule.com/asia-cup-2022-schedule-team-venue-time-table-pdf-point-table-ranking-winning-prediction/
हे पण वाचा :
‘या’ कारणांमुळे नाकारला जाऊ शकतो Life Insurance क्लेम !!!
Technology : कॉम्प्युटरवरून चुकून डिलीट झालेल्या फाईल्स अशाप्रकारे करा रिकव्हर !!!
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट नफा !!!
Mercedes Electric Car : मर्सिडीजने लॉन्च केली इलेक्ट्रिक कार; एका चार्जिंगमध्ये 580 किमी धावणार
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, आजचे नवीन दर पहा