India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ICC च्या ‘या’ नव्या नियमाचा भारताने घेतला मोठा फायदा !!!

India vs Pakistan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India vs Pakistan : रवींद्र जडेजाची संयमी आणि हार्दिक पंड्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने आशिया कपमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात थरारक विजय नोंदवला. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने भारताला 148 धावांचे आव्हान दिले. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने 2 चेंडू राखून विजय मिळवला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या दोघांवरही या सामन्यातील दबाव दिसून आला. कारण ICC च्या एका नव्या नियमाचा फटका भारत आणि पाकिस्तानच्या संघांना बसला लागला. हे लक्षात घ्या कि, भारत आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत 20 षटके टाकता आलेली नाहीत. ज्याचा परिणाम सामन्याच्या निकालावरही झाला. India vs Pakistan

Asia Cup 2022: India penalised for slow over rate against Pakistan in Dubai - Sports News

ICC च्या नव्या नियमाविषयी जाणून घ्या

ICC च्या नवीन नियमानुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करावा लागतो. मात्र जर एखादा संघ ओव्हर रेटमध्ये निर्धारित वेळेपेक्षा मागे राहत असेल तर उर्वरित षटकांमध्ये त्यांच्या एका क्षेत्ररक्षकाला 30 यार्डच्या सर्कलच्या आत उभे राहावे लागेल. ज्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला मोठा फटका बसतो आहे. नियमांनुसार पॉवरप्ले (पहिली 6 षटके) नंतर 30 यार्ड सर्कलबाहेर 5 क्षेत्ररक्षक उभे करता येतात. मात्र आताच्या नवीन नियमांनंतर फक्त 4 क्षेत्ररक्षकच सर्कलबाहेर उभे राहू शकणार आहेत. हे लक्षात घ्या कि,16 ​​जानेवारी 2022 पासून हा नियम लागू करण्यात आला आहे. India vs Pakistan

Let us also keep a secret': Rohit on who would open with him in India vs Pakistan clash | Cricket News

रोहित शर्माही नव्या नियमाच्या जाळ्यात अडकला

या सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा पाकिस्तानचा संघ संघर्ष करत होता. यावेळी पाकिस्तानने 17 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात फक्त 114 धावा करता आलेल्या होत्या. अशा वेळी पाकिस्तन 135 धावाही करणार नाही असे वाटत होते. मात्र शेवटच्या षटकांमधील स्लो ओव्हर रेटमुळे रोहितला 30 यार्डच्या आत क्षेत्ररक्षक आणावा लागला. यानंतर पाकिस्तानच्या शेपटाने शेवटच्या 17 चेंडूत 33 धावा केल्या. India vs Pakistan

India vs Pakistan: Head to Head Records of IND vs PAK In Asia Cup History

बाबर आझमलाही बसला मोठा फटका

पाकिस्तानच्या संघाला निर्धारित वेळेत फक्त 17 षटकेच टाकता आली. यानंतर बाबर आझमला शेवटच्या तीन षटकांमध्ये 30 यार्डच्या आत क्षेत्ररक्षक आणावा लागला. इथूनच सामना भारताच्या बाजूने झुकला. यावेळी शेवटच्या 18 चेंडूत भारताला 32 धावांची गरज होती. यानंतर जेव्हा नसीम शाह 18 वे षटक टाकायला आला तेव्हा हार्दिक-जडेजाने त्याच्या या षटकात 11 धावा जोडल्या. India vs Pakistan

IND Vs PAK, Asia Cup Cricket 2022: Hardik Pandya Aces Nervy Chase To Help India Beat Pakistan - Highlights

यानंतर भारताला 12 चेंडूत 21 धावांची गरज होती. अशा वेळी बाबरने 19व्या षटकात पाकिस्तानचा सर्वात अनुभवी गोलंदाज हारिस रौफकडे चेंडू सोपवला. याच षटकात पंड्याने रौफला तीन चौकार ठोकत 14 धावा काढल्या. यानंतरच्या अखेरच्या षटकात ऑफस्पिनर मोहम्मद नवाजला षटकार ठोकत पांड्याने जबरदस्त भारताला विजय मिळवून दिला. India vs Pakistan

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.icccricketschedule.com/asia-cup-2022-schedule-team-venue-time-table-pdf-point-table-ranking-winning-prediction/

हे पण वाचा :

Hardik Pandya : ज्या मैदानावरून स्ट्रेचरवर पडून बाहेर पडला त्याच मैदानावर रचला इतिहास !!!

Business Idea : पोस्ट ऑफिसद्वारे दरमहा चांगले पैसे कमावण्याची संधी !!!

Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये.!!!

Post Office च्या ‘या’ 3 योजनांमध्ये टॅक्स सवलतींबरोबरच मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!

Bank Loan : SBI खातेदारांना FD वर घेता येऊ शकेल कर्ज, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या