आता भारत अमेरिकेत तयार करेल नवीन गुहा ! जिथे साठवले जाईल कोट्यवधी टन तेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीचा फायदा घेण्यासाठी भारत आता अमेरिकेत कच्चे तेल साठवण्याच्या पर्यायावर विचार करीत आहे. भारतात सध्या सर्व लोकल स्टोरेज पूर्णपणे परवडण्यायोग्य नाही आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी सीएनबीसी टीव्ही १८ वाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियानेही अशीच पावले उचलल्याची माहिती त्यांनी दिली होती. स्वस्त झालेल्या कच्च्या तेलाचा फायदा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियालाही अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्वमध्ये कच्चे तेल साठवायचे आहे.

यावर्षी कच्च्या तेलाच्या किंमतीत ४०% घट झाली आहे
प्रधान म्हणाले, “आम्ही आमच्या देशातील इन्वेस्टमेंटचा दुसर्‍या देशात साठवण्याच्या शक्यतेचा शोध घेत आहोत. आम्ही अमेरिकेत अशी शक्यता पाहात आहोत जिथे कच्चे तेल साठवले जाऊ शकते.” २०२० मध्ये आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किंमतीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. मात्र, गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यामध्ये किंचितसी वाढ झाली आहे.

९ दशलक्ष टन तेल जहाजांमध्ये स्टोअर
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक आणि तेल आयात करणारा देश आहे. प्रधान म्हणाले की स्वस्त दराचा फायदा घेऊन आम्ही ५.३३ दशलक्ष टनाचा स्ट्रॅटेजिक स्टोरेज केलेला आहे. जगातील विविध भागांत सध्या ९ दशलक्ष टन तेल जहाजांमध्ये स्टोअर आहे.

भारत ८० टक्के तेल आयात करतो
भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. प्रधान म्हणाले की, भारताने साठवलेल्या स्टोअरची संख्या ही एकूण आवश्यकतेच्या २० टक्के आहे. सरकार हे स्ट्रॅटेजिक स्टोरेज वाढवून १ दशलक्ष टनांवर नेण्याचा विचार करत आहे.

याक्षणी भारताने किती तेल साठवले आहे ?
भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा आयात करणारा देश आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की भारतात ५३.३ लाख टनाचा स्ट्रॅटेजिक स्टोरेज केलेला आहे जो पूर्णपणे भरला आहे. याशिवाय जहाजांमध्येही सुमारे ८५ ते ९० लाख टन तेल साठा आहे. त्याचा मोठा भाग आखाती देशांमध्ये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.