नवी दिल्ली । तेलाचे दर वाढतच आहेत. त्याचबरोबर कच्च्या तेलाची किंमत कमी करण्याचा विचार सौदी अरेबियासह इतर तेल निर्यात करणार्या देशांची संघटना ओपेक (OPEC) ने केला नाही तर भारताने सौदी अरेबियाकडून तेल आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 70 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. यामुळे, भारतीय तेल रिफायनरीजनी अमेरिकेतून अधिकाधिक तेल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, जिथे दर कमी आहेत.
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातकर्ता देश आहे
चीन आणि जपाननंतर भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयातकर्ता देश आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारताच्या स्टेट रिफायनरीजने सौदी अरेबियातून तेल आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अहवालानुसार, सौदी अरेबियातून तेल आयात मे पर्यंत एक चतुर्थांश कमी केली जाईल.
खरं तर, किंमत कमी करण्याची विनंती मेनी न झाल्याने केंद्र सरकारने नवीन पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. भारत सरकारला आता तेलासाठी मिडिल ईस्ट देशांवरील आपले अवलंबन कमी करायचे आहे. भारताची रिफायनरी क्षमता दररोज 5 मिलियन बॅरल आहे. त्यापैकी 60 टक्के नियंत्रण स्टेट रिफायनरीजकडे आहे. या सरकारी तेल कंपन्या सौदी अरेबियातून महिन्यात सुमारे 14.8 मिलियन बॅरल तेल आयात करतात. ते मेपर्यंत कमी करून 10.8 मिलियन बॅरेल करण्याचे सरकारचे नियोजन आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.