हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसची भीती जगभर पसरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझरने या विषाणूला आंतरराष्ट्रीय साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. काही लोकांच्या दुर्लक्षामुळे हा आजार सतत पसरत आहे.या विषाणूमुळे अनेक देशात कर्फ्यूसारख्या परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. बरीच शहरे लॉक डाऊन करण्यात आली आहेत. म्हणूनच,सर्व देशांचे सरकार लोकांना वारंवार त्यांच्या स्वत: च्या घरात राहण्याचे आवाहन करीत आहे. जेणेकरून या विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येईल.
कोरोनाच्या लढ्यात भारताने जगाला मार्ग दाखवावा अशा शब्दात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने भारताचे कौतुक केले आहे.भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ४९९ वर पोहचली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर असली तरीही योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु ठेवलं पाहिजे असंही WHO ने सुचवलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सदस्य वाल्टर रिक्कार्डी म्हणाले की, जगभरातील आपत्कालीन विभागात तैनात असलेल्या प्रत्येक डॉक्टरांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणताही रुग्ण या धोकादायक विषाणूचा प्रसार (वाहक) असू शकतो. म्हणूनच, श्वास किंवा तापाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
करोना अपडेट्स: महाराष्ट्रात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पार, तर देशात ५००
खुशखबर! पुण्याच्या ‘या’ लॅबने बनवले स्वदेशी कोरोना टेस्टिंग किट, आठवड्यात तयार करणार १ लाख किट
कोण आहे तो पहिला रुग्ण ज्याच्यामुळे संपूर्ण इटलीमध्ये कोरोनाचा पसरला संसर्ग ?