भारतीय हवाई दलाने ऐकली पंतप्रधान मोदींची स्वदेशीची हाक; या कंपनीकडून खरेदी करणार ८३ जेट विमाने

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशाला संबोधित करताना लोकल साठी वोकल बनायचे आवाहन केले. म्हणजेच स्वयंपूर्ण होऊन स्थानिक वस्तूंचा वापर वाढवण्याविषयी त्यांनी लोकांना सांगितले. याची सुरुवात सरकारने अत्यंत रंजक पद्धतीने केली आहे. खरं तर दोनच वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ११४ विमानांसाठी टेंडर मागवले होते. मात्र आता केंद्र सरकार त्यांना आपल्या स्थानिक बाजारातच तयार करण्यावर जोर देत आहे. यासाठी सरकारने देशातच बनवल्या गेलेल्या लढाऊ विमानांवर स्विच करण्याची योजना आखली आहे.

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हवाई दल आता  स्वदेशी आपल्या बनावटीचे हलके लढाऊ विमान (एलसीए) तेजस हे आपल्या विमानाच्या ताफ्यात समाविष्ट करेल. रावत म्हणाले की, ४० विमानांच्या जुन्या ऑर्डर व्यतिरिक्त एअरफोर्स आणखी नवीन ८३ जेट विमानांची खरेदी करेल. ज्याच्या किंमती जवळपास ६ अब्ज डॉलर्स इतकी असेल.

रावत पुढे म्हणाले की, हवाई दल आता या हलक्या लढाऊ विमानांचा वापर करेल. यासाठी जागतिक निविदा केव्हा देण्यात येतील असे विचारले असता रावत म्हणाले की परदेशी कंपन्यांऐवजी देशांतर्गत कंपन्यांना आता आदेश दिला जाईल. हे जेट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) खरेदी केले जातील, असेही रावत यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.