हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनव्हायरसविषयीची माहिती देण्यासाठी पाकिस्तान सरकारने एक वेबसाइट तयार केली आहे. यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग म्हणून दाखवला गेला आहे. आतापर्यंत पाकिस्तान पीओकेवर आपला अधिकार ठामपणे सांगत आलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तेथे निवडणुकाही घेण्याचे आदेश दिले होते. यावर भारताने तीव्र निषेध नोंदविला होता. आता अधिकृत संकेतस्थळावर, पीओकेला इम्रान सरकारने भारताचा भाग म्हणून दाखवले आहे. Covid.gov.pok ही वेबसाइट ग्राफिक्सद्वारे कोरोनाच्या संक्रमणाच्या प्रसाराचे वर्णन करते.
भारत म्हणाला- गिलगिट-बाल्टिस्तान हा आपला अविभाज्य भाग आहे
पाकव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेण्याच्या आदेशाचा भारताने तीव्र विरोध केला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी असे म्हटले होते की,’संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख व्यतिरिक्त गिलगिट-बाल्टिस्तान हा देखील भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पाकिस्तानने ते त्वरित रिकामे करावे. येथे त्यांचा हस्तक्षेप हा अवैध आहे.’
soc
पीओकेतील शहरांच्या हवामानाच्या बातम्या भारत प्रसारित करतो
सरकारी प्रसारक दूरदर्शन (डीडी) आणि ऑल इंडिया रेडिओने ८ मेपासून मीरपूर, मुझफ्फराबाद आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरच्या गिलगिट (पीओके) मधील हवामानाच्या बातम्यांचे प्रसारण सुरु केले आहे. डीडी आणि आकाशवाणीच्या हवामान रिपोर्टमध्ये पीओकेचे मीरपूर, मुझफ्फराबाद आणि गिलगिट या भागातील बातम्याचा समावेश आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की,’ या उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानादरम्यान, दूरदर्शन आणि राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारक म्हणून अखिल भारतीय रेडिओने भारतातील या संपूर्ण प्रदेशाच्या एकूणच हवामानविषयक वृत्तांचे प्रसारण करणे महत्त्वपूर्ण ठरले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की,’ डीडी न्यूज त्याच्या रोजच्या सकाळ आणि संध्याकाळच्या बातमी बुलेटिनमध्ये या भागाच्या हवामानाशी संबंधित बातम्या देतात. आकाशवाणीमध्ये, प्रमुख बुलेटिनमध्ये दिवसभर हवामानाची माहिती देखील असते.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.