औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमधील शहागंज मंडीत शुक्रवारी एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली. या मृत गुंडांचे नाव जमीर खान शब्बीर खान आहे. त्याच्यावर अनेक चोरीच्या आणि घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हि हत्या पैशाच्या देवाण- घेवाणीतून झाल्याचे समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण
या मृत गुंड्याचे नाव जमीर खान शब्बीर खान ऊर्फ जम्या असे आहे. त्याचा साडूसोबत पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला होता. यामुळे त्यांच्यात अनेकवेळा भांडणेदेखील झाले आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मृत जमीर खान शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोरील इमारतीजवळ उभा होता. त्यावेळी जमीरचा साडू शोहेब खान आपल्या अन्य एका मित्रासोबत त्या ठिकाणी आला. यावेळी जमीर आणि शोहेब यांच्यात पैशांच्या देवाण- घेवाणीतून पुन्हा वाद झाला. या वाद एवढा वाढला कि शोहेब आणि त्याच्यासोबत आलेल्या मित्राने धारदार शस्त्राने जमीरवर हल्ला केला.
आरोपींनी जमीरच्या छाती, पोट आणि मांडीवर गंभीर वार करत त्याला जखमी केले. हा हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी जमीरला त्वरित घाटी रुग्णालयात नेले. जखमी जमीरला रुग्णालयात घेऊन जात असताना, पोलिसांना हा प्रकार समजला व त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
घरफोडी आणि चोरीच्या गंभीर गुन्ह्यांत आरोपी
जमीर खान ऊर्फ जम्या हा घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी आहे. त्याने परिसरात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. पण मागच्या काही दिवसांपासून मृत जमीरने घरफोडी अथवा चोरी केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी जमीर खान ऊर्फ जम्याचा साडू शोहेब खानला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.