शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करा, केंद्रीय अवर सचिवांनी पत्राद्वारे दिले प्रशासनाला आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | केंद्र व राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने या निधीतून शहरात निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच शहरातील रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता तपासणी करण्याचे आदेश नुकतेच केंद्रीय अवर सचिवांनी प्रशासनाला दिले आहे.

औरंगाबाद शहरातील नागरिक सुरज अजमेरा यांनी शासन निधीतून पालिकेमार्फंत शहरात केलेल्या रस्त्यांच्या कामांची तपासणी करावी. तसेच यासाठी केंद्राची उच्चस्तरिय चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी फेब्रुवारी महिन्यांत केंद्र सरकारकडे केली होती. त्यावर आता केंद्रीय अवर सचिव संजय कुमार यांनी पत्राव्दारे यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याची सुचना राज्याच्या नगर विकास विभाग मुख्य सचिवांना केली आहे.

शहरात प्रत्येकवेळी काही ना काही कामांसाठी चांगले रस्ते खोदण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत.
त्यामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांवरुन दिवसभरात प्रवास करणार्‍या वाहन चालकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. काही ठिकाणी अपघातही होतात.
रस्त्यांसाठी आलेल्या निधीचा त्यासाठीच वापर व्हावा, यासाठी त्वरित केंद्रीय चौकशी समिती स्थापन करून त्याद्वारे वॉच ठेवण्याची मागणी होत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group