हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Post Office : सध्याच्या काळात इन्शुरन्सचे महत्त्व खूप वाढले आहे. अनिश्चिततेने भरलेल्या आयुष्यात कधीही काहीही अपघात होऊ शकतात. ज्यामुळे इन्शुरन्स पॉलिसी असणे खूप महत्वाचे ठरते. यामुळे उपचाराचा खर्च तर भरून निघेलच त्याच बरोबर जर एखाद्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्यासाठी क्लेम करता येईल. मात्र अशी अनेक लोकं आहेत ज्यांनी अजूनही इन्शुरन्स घेतलेला नाही. यामागील एक कारण म्हणजे इन्शुरन्सच्या प्रीमियमची किंमत. हे लक्षात घेऊन भारतीय टपाल विभागाने समूह अपघात संरक्षण विमा पॉलिसी आणली आहे.
या पॉलिसीमध्ये, कोणत्याही व्यक्तीला फक्त 299 रुपये आणि 399 रुपये प्रीमियम भरून 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. मात्र ही इन्शुरन्स पॉलिसी दरवर्षी रिन्यूअल करावी लागेल. मात्र त्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्ये खाते असावे लागेल. या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जर एखाद्या अपघातात पॉलिसीधारकाला दुखापत झाल्यास, IPD च्या खर्चासाठी 60 हजार आणि OPD च्या खर्चासाठी 30 हजार दिले जातात. Post Office
अशा प्रकारचे मिळतील फायदे
भारतीय टपाल विभागाने टाटा एआयजीच्या सहकार्याने ही अपघाती विमा पॉलिसी लाँच केली आहे. यामध्ये एकूण दोन प्लॅन्स दिले जातात. यातील पहिल्या प्लॅनमध्ये वार्षिक 299 रुपये प्रीमियम भरावा लागेल तर दुसऱ्या प्लॅनमध्ये 399 रुपये भरावे लागतील. जर एखाद्याने 299 रुपयांचा प्लॅन निवडला तर त्याला 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. तसेच जर विमाधारकाचा अपघात झाल्यास त्याला हॉस्पिटलायझेशनचा खर्च मिळेल. तसेच रुग्णालयातील उपचारादरम्यान 60,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च आणि 30,000 रुपयांपर्यंतचा OPD क्लेम दिला जातो. Post Office
मृत्यू झाल्यास अवलंबून असलेल्यांना 10 लाख
अपघाती मृत्यू झाल्यास आश्रितांना नुकसानभरपाई म्हणून 10 लाख रुपये दिले जाईल. इतकेच नाही तर विमाधारकाला अपंगत्व आल्यास त्याला 10 लाख रुपये दिले जातील. तसेच आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत 10 लाख रुपये दिले जाईल. यामध्ये विमाधारकाच्या मृत्यूनंतर, आश्रितांना अंत्यसंस्कारासाठी 5,000 रुपये मिळतील. जर विमाधारकाचे अवलंबित दुसर्या शहरात राहत असतील तर तेथून येण्या-जाण्याचा खर्च देखील या पॉलिसी अंतर्गत दिला जाईल. त्याच वेळी, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये वरील सर्व क्लेम बरोबरच अवलंबितांच्या 2 मुलांना शिक्षणासाठी 1 लाख रुपयांचा खर्च दिला जातो. Post Office
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/
हे पण वाचा :
Lamborghini Huracan Tecnica : लॅम्बोर्गिनीने लॉन्च केली जबरदस्त कार; ताशी 325 किमी स्पीड
Bank Holidays : सप्टेंबरमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा !!!
Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा महागले, आजचा भाव पहा
Bank Holidays : सप्टेंबरमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा !!!
E-Shram : ‘या’ सरकारी योजनेमध्ये कामगारांना दिला जातो 2 लाख रुपयांचा मोफत विमा !!!