अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात
मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणुन मुलगी व जावई या पती पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देउन जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे झाली आहे. पती पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मंगेश रणसिंग गंभीर जखमी तर रुख्मिणी रणसिंग हिचा पुणें येथे ससून हॉस्पिटल मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असुन एक जण फरार आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की निघोज येथे गवंडी व्यवसाय करणारे मंगेश चंद्रकांत रणसिंग 1 मे रोजी त्यांची पत्नी रुक्मिणी मंगेश रणसिंग यांना भेटण्यासाठी निघोज येथे वाघाचा वाडा येथे गेले होते.
त्यापूर्वी या पतीतत्नीचे स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाले होते. म्हणून रुक्मिणी ही माहेरी निघून गेली होती. मंगेश रूक्मीणीला भेटण्यासाठी घरी गेल्यावर रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मीणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रूक्मीणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली असता वरील तिघांनी या पतीतत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. व घराला कूलूप लावून निघून गेले. मात्र आरडाओरडा ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.
मंगेश व रुक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तीचे वडील काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता. म्हणून एक ना एक दिवस त्यांचा काटा काढण्याचा या तिघांचा प्रयत्न होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रुक्मिणी यांचा जबाब काल दि. 4 रोजी घेतला असून त्यात या पतीतत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलीसांनी तीचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले असून रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार झाला आहे.