काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफळला?? बाळासाहेब थोरात, नितीन राऊत दिल्लीत दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा  अध्यक्षपदावरून  काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे नाना पटोले यांची तक्रार थेट राहुल गांधीकडे करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले असून त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील आहेत. दरम्यान या घटनेवरून काँग्रेस मधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विधानसभा अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद अद्यापही काँग्रेसला मिळालं नाही. या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. यासाठी थोरात, राऊत हे दिल्लीत काँग्रेस हायकमांड आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.त्याचसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत.

विशेष म्हणजे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही ही निवडणूक झाली नाही. त्यामुळे अध्यक्षपदावरूनही काँग्रेसमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे.

Leave a Comment