अबब !!! हे काय तब्बल १३ लाखांची दारू चोरली; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या विषाणूच्या नियंत्रणासाठी दक्षिण आफ्रिकेत ६६ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाउन संपण्याच्या एकच दिवस आधी भुयार खोदून काही चोरांनी वाइन शॉपमधून तब्बल ३ लाख रॅंड (जवळपास १३ लाख ६० हजार) किंमतीची दारु चोरली असल्याची घटना समोर आली आहे.

कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला होता. या लॉकडाउनमध्ये अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यातही दारुची दुकाने बंद असल्यामुळे तर मद्यप्रेमींचे हाल पाहण्यासारखे होते. दक्षिण आफ्रिकेतही मार्च महिन्यापासून लॉकडाउनमुळे दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. यावेळी हे मदयचोरीची घटना घडली. वाईन शॉपच्या मालकाने जेव्हा सोमवारी सकाळी दुकान उघडले त्यानंतर चोरी झाली असल्याचे समोर आले. चोरी करणाऱ्या चोरांची सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे ओळख पटवण्यात आली आहे. हे चोर काही दिवस आधीही या दुकानावर आले असल्याची माहिती मालकाने दिली. या चोरांची माहिती देणाऱ्यांना ५० हजार रँडचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेतिळ वाईन शॉपमध्ये चोरीचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे अनेकजणांनी वाईन शॉपच्या सुरक्षिततेसाठी खास सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. लॉकडाउनमुळे मद्य विक्रीवर बंदी होती. त्यामुळे अनेकजणांची गैरसोय होत होती. तसेच दारू विक्रीवर बंदी असल्यामुळे काळ्या बाजारात १० पट जास्त किंमतीने दारुची विक्री करण्यात येत आहे. आता, दारू विक्री करण्यास सरकारने मंजुरी दिली असून सोमवार ते गुरुवार दरम्यानच दारू विक्री करता येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाच्या संसर्गाचे ३४ हजार ३५७ रुग्ण आढळले असून ७०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.