हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Digital Gold : सोने हे गुंतवणूकदारांच्या पसंतीस राहिले आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच सुरक्षित मानले जाते. त्याच बरोबर ते फायदेशीर देखील असते. मात्र सोन्यामध्ये काही जोखिमही असते. कारण आपल्याकडे असलेले सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू या चोरीला जाण्याची आणि हरवण्याची भीती देखील असते. ज्यामुळे त्याची सुरक्षितता राखणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणुकीचे नवे आणि सुरक्षित माध्यम म्हणून डिजिटल गोल्ड लोकप्रिय होते आहे. तसेच आजकाल यामधील गुंतवणूकीकडेही ग्राहकांचा कल वाढतो आहे. हे लक्षात घ्या कि, सॉव्हरेन गोल्ड फंड आणि गोल्ड ईटीएफ हे डिजिटल गोल्ड मधील गुंतवणुकीचे दोन प्रमुख माध्यम आहेत.
डिजिटल गोल्ड म्हणजे काय ???
हे लक्षात घ्या कि, Digital Gold हे ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. यामध्ये आपल्या डिजिटल वॉलेटमध्ये सोने जमा केले जाते. याशिवाय आपल्याला त्याची खरेदी आणि विक्री देखील करता येते. तसेच जर आपल्याला हवे असेल तर काही अतिरिक्त शुल्क भरून डिजिटल गोल्ड फिजिकल गोल्डमध्ये देखील कन्व्हर्ट करता येते.
सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक कशी करावी ???
हे लक्षात घ्या कि, 2015 पासून ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणुकीचा एक नवीन पर्याय म्हणून सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केले जातात. यामध्ये कमीत कमी एक ग्रॅम सोन्याची खरेदी करता येईल. खरे तर फिजिकल गोल्डची खरेदी कमी करण्यासाठी सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्स योजना सुरु करण्यात आली आहे. Digital Gold
या सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड्सवर वार्षिकरित्या 2.5% व्याज दिले जाते. तसेच ग्राहकांना ते ऑनलाइन किंवा कॅशद्वारे खरेदी करता येईल. तसेच ते 8 वर्षांच्या कालावधीत पूर्ण झाले आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो गोल्ड बॉण्ड्स खरेदी करता येतील. Digital Gold
गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक कशी करावी ???
हे लक्षात घ्या कि, शेअर्सप्रमाणेच गोल्ड ईटीएफ विकत घेता येतात आणि डिमॅट खात्यात ठेवता येतात. गोल्ड ईटीएफमध्ये प्रत्यक्ष सोने मिळत नाही, तर यामध्ये सोन्याच्या किंमतीएवढी कॅश जमा होते. त्याचप्रमाणे, गोल्ड ईटीएफच्या विक्रीच्या वेळी देखील प्रत्यक्ष सोने मिळत नाही त्यावेळी देखील सोन्याच्या त्यावेळच्या किंमतीच्या प्रमाणत रोख रक्कम जमा होते. इथे ही रक्कम आपल्या डिमॅट खात्यामध्ये जमा केली जाते.
मात्र, गोल्ड ईटीएफची खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्याकडे डिमॅट खाते असावे लागेल. तसेच याद्वारे स्टॉक एक्स्चेंजवर कमीत कमी एका गोल्ड ईटीएफ युनिटची खरेदी आणि विक्री करता येईल. मात्र ज्या गुंतवणूकदारांकडे डीमॅट खाते नसेल त्यांना गोल्ड फंड ऑफ फंड्स वापरून गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येईल. Digital Gold
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/investments-deposits/govt-schemes/gold-banking/sovereign-gold-bond-scheme-sgb
हे पण वाचा :
DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!
IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या