म्युच्युअल फंडांमध्ये करायची असेल गुंतवणूक तर त्वरित करा ‘हे’ काम अन्यथा तुम्हांला पैसे काढता येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजन्सी कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) नुसार, म्युच्युअल फंडांमध्ये (MF) गुंतवणूक करणाऱ्या सुमारे 20-30 लाख लोकांनी त्यांचे पॅन आधारशी लिंक केलेले नाहीत. अशा परिस्थितीत आता 30 सप्टेंबरनंतर त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. वास्तविक, 30 सप्टेंबरपासून एक महत्त्वाचा नियम बदलणार आहे. या नियमानुसार, जे या मुदतीपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक करणार नाहीत, त्यांचे पॅन कार्ड इनव्हॅलिड ठरेल. याचा थेट परिणाम म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरही होईल.

तुमचे पॅन आधारशी लिंक करण्याची सध्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. जर तुम्ही दोघांना लिंक करण्यात अपयशी ठरलात तर इन्कम टॅक्स एक्ट नुसार 10,000 रुपये दंड आहे. सर्वात मोठी समस्या अशी असेल की, तुमचे पॅन कार्ड इनव्हॅलिड किंवा निष्क्रिय होईल.

कोणतीही गुंतवणूक करू शकणार नाही
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दोन Documentation Process मधून जावे लागेल. एक, तुम्हांला KYC च्या निकषांचे पालन करावे लागेल आणि दुसरे, तुमच्याकडे व्हॅलिड पॅन असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर आधार लिंक न केल्याने तुमचे पॅन इनव्हॅलिड ठरले तर तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकणार नाही.

SIP थांबेल
जर तुम्ही तुमचा पॅन आधारशी लिंक केला नाही, तर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये नवीन गुंतवणूक करू शकणार नाही किंवा म्युच्युअल फंडाचे पैसे घेऊ शकणार नाही. SEBI च्या नियमानुसार, KYC आणि पॅन व्हॅलिड असतानाच फंड काढला जय शकेल.

पॅन-आधार लिंक कसे करावे हे जाणून घ्या
सर्वप्रथम तुम्हांला  https://www.incometax.gov.in/iec/foportal  या लिंकवर क्लिक करावे लागेल.
– जर तुम्ही रजिस्टर्ड नसाल तर आधी रजिस्ट्रेशन करा तुमचा युझर आयडी पॅन असेल.
– तुमच्या युझर आयडीने लॉगिन करा आणि तुमची जन्मतारीख हा पासवर्ड असेल.
– यानंतर एक विंडो पॉपअप होईल. ज्यामध्ये असे लिहिले जाईल की, तुमचे पॅन आधारशी लिंक करा जर ते पॉप अप होत नसेल तर तुम्ही मेनू बारच्या प्रोफाइल    सेटिंगमध्ये जाऊन लिंक आधार वर क्लिक करा.
– येथे तुमचे नाव, जन्मतारीख, सर्वकाही तुमच्या पॅननुसार असेल.
– पॅन माहिती वेरिफाय करा. काही चूक असेल तर ती दुरुस्त केल्यानंतर लिंक करा, पण जर सर्व माहिती बरोबर असेल तर Link Now बटणावर क्लिक करा.
यानंतर एक विंडो पॉपअप होईल ज्यामध्ये असे लिहिले जाईल की, आधार पॅनशी जोडला गेला आहे.

Leave a Comment