हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पोस्टाच्या छोट्या-छोट्या स्कीम आहेत ज्या हमखास रिटर्न मिळवून देतात. काही लोक हमखास रिटर्न मिळवण्यात विश्वास ठेवत असतात. अश्या लोकांसाठी आम्ही तुम्हाला पोस्टाची एक स्कीम सांगणार आहोत, जी तुम्हाला गुंतवणुकीनंतर महिन्याला फिक्स इन्कम देणार आहे. ती म्हणजे पोस्टाची मंथली इन्कम स्कीम!
पोस्टातील या स्किमचे अकाउंट 1000 रुपयांच्या पटीमध्ये उघडता येणार आहे. एका वैयक्तिक खात्यासाठी 4.5 लाख रुपयांपर्यंत जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकतो. जॉईंट अकाउंट मध्ये जास्तीत जास्त 90 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. 01.04.2020 पासून पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (MIS) साठी व्याजदर हा 6.6 टक्के असणार आहे. म्हणजे जर 4.5 लाख रुपये जमा केले तर त्यावर वार्षिक व्याज 29,700 रुपये इतके होईल. आणि जॉईंट अकाउंट मध्ये 9 लाख गुंतवणूक केल्यास वार्षिक व्याज 59,400 होईल. वार्षिक रकमेस महिण्यानुसार गणित करून पाहिल्यास ही रक्कम 4,950 इतकी येते.
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये एक व्यक्ती सिंगल अकाऊंट उघडू शकतो. जॉइंट अकाउंट तीन व्यक्तीपर्यंत उघडू शकतात. दहा वर्षापर्यंतच्या मुलाचे अकाउंट उघडायचे असल्यास त्याचे पालक त्याच्यासाठी उघडू शकतात. दहा वर्षानंतर नंतर कोणतीही व्यक्ती त्यांच्या स्वतःचे अकाउंट उघडू शकतो. अकाउंट उघडल्यानंतर जवळच्या पोस्ट ऑफिसमधून आलेले व्याज आपण काढून घेऊ शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”