हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment : आजकाल लोकं आपल्या भविष्याबाबत खूप सजग झाले आहेत. प्रत्येकाला चांगल्या भविष्यासाठी मोठी बचत करायची आहे. आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुरुवातीपासूनच गुंतवणूकीचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल मुलांच्या शिक्षणावर खूप खर्च होतो. हे लक्षात घेऊनच अनेकजण मुलांच्या शिक्षणासाठी मोठा फंड उभारण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी लवकरात लवकर आणि थोडी जास्त गुंतवणूक करावी लागेल.
अशा प्रकारे करा गुंतवणूक
एका मीडिया रिपोर्टनुसार, प्लॅन अहेड वेल्थ एडव्हायझर्सचे संस्थापक आणि सीईओ असलेले विशाल धवन म्हणतात की,” जर एखाद्याला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करायचे असतील तर त्याने लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करावी. त्यासाठी त्याला दर महिन्याला भरपूर रिटर्न देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवावे लागतील. तसेच हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एका महिन्यात किमान 50 हजार रुपये गुंतवावे लागतील. मात्र ज्यांच्याकडे योग्य कॅश फ्लो नसतो, अशांसाठी SIP योग्य ठरेल.” Investment
टर्म लाइफ इन्शुरन्स
धवन पुढे म्हणाले की,”या गुंतवणुकीसोबतच टर्म लाइफ इन्शुरन्स देखील घ्यायला हवा. जर आपला अचानक अपघात झाला तर टर्म लाइफ इन्शुरन्स द्वारे मिळणारे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी होत असलेली बचत टिकवण्यासाठी वापरता येतील. यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करण्याच्या तीन वर्षे आधीपासूनच डेटमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करायला हवी. यामुळे इक्विटी मार्केटमधील अस्थिरतेचा शिक्षणासाठीच्या पैशांवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लेक्स कॅप फंड आणि इंडेक्स फंडांमध्ये देखील गुंतवणूक करता येईल. Investment
टर्म लाइफ इन्शुरन्सच्या अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iciciprulife.com/term-insurance.html
हे पण वाचा :
Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!
Bollywood : 2022 मध्ये अवघ्या 5 महिन्यात संगीत क्षेत्राने गमावले ‘हे’ 7 दिग्गज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा
FD Rates : आता ‘या’ NBFC च्या स्पेशल FD वर मिळणार 7.45% व्याज !!!