हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : ‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ अशी एक म्हण प्रचलित आहे. जी आपल्या आर्थिक जीवनासाठी तंतोतंत लागू पडते. आपल्या दररोजच्या जीवनात अशा अनेक लहानलहान गोष्टी असतात ज्या योग्यरितीने मॅनेज केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. याचा अर्थ आपल्याकडून उचलण्यात आलेली छोटी पावलेही आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकतात.
जर एखाद्याने आपल्या व्यवसायिक कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासूनच नियमितपणे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याला लवकरच आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्याद्वारे 20-21 वर्षांचे तरुण वयाच्या 30 वर्षांपर्यंत आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतील. Investment Tips
SIP
कमी कालावधीमध्ये दुप्पट किंवा तिप्पट पैसे मिळवण्यासाठी SIP हा एक अतिशय प्रभावी पर्याय असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. SAG इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता सांगतात की,” वयाच्या 25 व्या वर्षीच SIP सुरू करावी. लवकर सुरू केल्याने SIP द्वारे ठराविक कालावधीत चांगला नफा देखील मिळतो.” Investment Tips
PPF
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा गुंतवणुकीचा आणखी एक चांगला पर्याय ठरेल. याद्वारे निश्चित रिटर्न तर मिळतोच तसेच याद्वारे टॅक्स बेनिफिट्स देखील मिळतात. त्याचबरोबर PPF मध्ये मॅच्युरिटीवर जी रक्कम मिळेल त्यावर कोणताही टॅक्सदेखील द्यावा लागत नाही. Investment Tips
शेअर बाजार
शेअर बाजाराद्वारे मोठा रिटर्न मिळू शकतो. त्यामुळे शेअर बाजार हे नवीन गुंतवणूकदारांची नेहमीच पहिली आवड बनून राहिला आहे. शेअर बाजाराद्वारे अनेक लोकं करोडपती आणि अब्जाधीश झाले आहेत यात शंका नाही. Investment Tips
क्रिप्टो एसेट्स
क्रिप्टो एसेट्स मध्ये गुंतवणूक करूनही चांगला नफा मिळू शकेल. मात्र, यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवा. बाजारात घसरण झालेली असताना क्रिप्टोकरन्सी खरेदी करा. यासाठी असे काही कॉइन्स निवडा ज्यांची मार्केटवर चांगली पकड असेल आणि सध्या ते घसरणीमध्ये असतील. तसेच अशा कॉइन्समध्ये गुंतवणूक करा जे भविष्यातही चांगला नफा देऊ शकतील. Investment Tips
व्यावसायिक रिअल इस्टेट
देविका ग्रुपचे एमडी असलेले अंकित अग्रवाल सांगतात की, 20-29 वयोगटातील लोकांसाठी व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणे चांगले ठरू शकेल. हे लक्षात घ्या कि, ऑफिस, रिटेल आणि वेअरहाऊस इत्यादी व्यावसायिक रिअल इस्टेटमधील सुरक्षित गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत. अंकित अग्रवाल यांच्या मते, ग्रेड-ए ऑफिस स्पेस द्वारे सरासरी 6-7 टक्के तर रिटेल युनिट्सद्वारे 8-9 टक्के रिटर्न मिळू शकतात. Investment Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.sbimf.com/en-us/sip
हे पण वाचा :
‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट नफा !!!
Train Cancelled : आजही रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे तपासा ट्रेनचे स्टेट्स
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये एका वर्षासाठी फ्री कॉलिंग सोबत मिळवा 24GB डेटा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, आजचे नवीन दर पहा
Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!