हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 15 Pro : आजकाल बाजारात अनेक नवनवीन कंपन्यांचे स्मार्टफोन दाखल होत आहेत. प्रत्येक कंपनी याद्वारे ग्राहकांना काहीतरी खास देण्याचा प्रयत्न करते. मात्र Apple ची उपकरणे जगभरात लोकप्रिय आहे. खास करून iPhone सीरीजचे अनेक चाहते आहेत. त्यामुळेच बाजारात दाखल होण्याआधीच iPhone बाबत जोरदार चर्चा होत असल्याचे आपण अनेकदा पहिले आहे. गेल्या वर्षीच लाँच झालेल्या iPhone 13 ने याबाबतचे सगळे रेकॉर्डच मोडीत काढले आहेत. Apple देखील आपल्या नवीन मॉडेल्सद्वारे ग्राहकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते.
आताही जगभरात नवीन iPhone 15 Pro बाबत चर्चा सुरु झाली आहे. हा आयफोन देखील याआधीच्या फोनपेक्षा काही कमी नसेल. यामध्येही जबरदस्त डिझाईन देण्यात येत असून जो स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये एक नवीन बेंचमार्क सेट करेल. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या आयफोनचे फोटो लीक करण्यात आले आहेत. ज्यावरून हा गेम चेंजर स्मार्टफोन ठरू शकेल असे म्हंटले जात आहे. तर आज आपण या स्मार्टफोनचे फिचर्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत…
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नवीन iPhone 15 Pro मध्ये आतापर्यंतचे सर्वात पातळ बेझल्स देण्यात येतील. यामध्ये 1.55 मिमी बेझल्स दिले जातील जे सध्याच्या आयफोन 14 प्रो पेक्षा जवळजवळ 28 टक्क्यांनी कमी आहे. यामध्ये 2.17 मिमी जाड बेझल्स दिले गेले आहेत.
iPhone 15 Pro लॉन्च होण्यापूर्वी जे काही फोटो बाहेर आले आहेत, त्यानुसार याच्या डिझाईनमध्ये मोठे बदल होणार नसल्याचे दिसून येत आहे. तसेच यामध्ये फिजिकली पॉवर आणि व्हॉल्यूम बटणेही दिली जाणार नाहीत. तसेच हा फोन वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स सहीत येईल. अशा प्रकारचा हा पहिलाच फोन असेल. तसेच यामध्ये म्यूट बटणाऐवजी ते लहान गोल एक्शन बटणासहीत येऊ शकेल. या iPhone 15 Pro मध्ये अपग्रेड केलेला डिस्प्ले देखील असेल ज्यामध्ये कदाचित 2,000-nits पेक्षा जास्त पीक ब्राइटनेस मिळेल.
iPhone 15 Pro Max मध्ये पहिल्यांदाच मॉडेल लाँग रेंज झूम असलेला नवीन पेरिस्कोप लेन्स दिला जाऊ शकेल. काही रिपोर्ट्स नुसार, हे 6X झूम लेन्स असू शकते जे 3X ऑप्टिकल झूमसहीत प्रो मॉडेलच्या क्षमतेपेक्षा दुप्पट असेल. तसेच हे यामध्ये A17 बायोनिक चिपसेटही उपलब्ध असेल जो आतापर्यंतचा सर्वात वेगवान प्रोसेसर असू शकेल.
या वर्षी सप्टेंबरमध्ये iPhone 15 Pro लॉन्च होण्याची शक्यता देखील आहे. मात्र याची किंमत किती असेल ते फोन लाँचिंगच्या वेळीच उघड केले जाईल. तसेच काही रिपोर्ट्सनुसार, याची किंमत जवळपास 1.3 लाख रुपयांच्या आसपास असू शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.apple.com/in/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर