शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर याआधीही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून आयपीएल स्थगित करण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाला शोएब अख्तर
‘सध्या भारताची स्थिती खूप खराब आहे, त्यामुळे आयपीएलच्या उरलेल्या मॅच स्थगित केल्या पाहिजेत. आयपीएलमध्ये जे पैसे खर्च होणार आहेत, त्यात ऑक्सिजन सिलेंडर विकत घ्या,’ असे शोएब अख्तरने आपल्या व्हिडिओमध्ये म्हणले आहे. तसेच शोएबने पीएसएल स्थगित करण्याची मागणी केली आहे. जेव्हा एखादा देश अशा परिस्थितीमध्ये असेल तेव्हा असे मनोरंजन नको, आम्हाला आयपीएल आणि पीएसएलही नको, अशी प्रतिक्रिया शोएबने व्हिडिओद्वारे दिली.

तसेच शोएब अख्तर पुढे म्हणाला,’या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लोकांचा जीव वाचवण्याचा विचार केला पाहिजे. तसेच आयपीएलसारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेसाठी होणारा खर्च ऑक्सिजन सिलेंडरसाठी करण्यात आला पाहिजे. भारत सध्या कोरोना महामारीचा सामना करत आहे, त्यामुळे आयपीएलचे आयोजन करण्यापेक्षा त्याला स्थगिती दिली पाहिजे. पाकिस्तानमध्येही जून महिन्यात पीएसएल होणार आहे, तीसुद्धा रद्द केली पाहिजे असे शोएब अख्तरने म्हंटले आहे. या अगोदर शोएब अख्तरने पाकिस्तानी नागरिकांनी भारताची मदत अशी मागणी केली होती. शोएबने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारताची परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे मदतीसाठी लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे असे आवाहन पाकिस्तानच्या नागरिकांना केले आहे.