IPL 2021: आयपीएलमधल्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंनी जिंकली सगळ्यांची मने

david warner and kane williamson
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चेन्नई : वृत्तसंस्था – सध्या आयपीएलचा १४व्या हंगाम सुरु आहे. या हंगामाला ९ एप्रिलला सुरुवात झाली आहे. तर ३० मे रोजी या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. आतापर्यंत या हंगामात ११ लढती झाल्या आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडूंचे अनेक नवनवीन व्हिडिओ वायरल होत असतात. तसेच खेळाडूंचे मैदानाबाहेरचे व्हिडिओसुद्धा अनेकदा चर्चेचे विषय ठरत असतात. असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

सध्या रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यामध्ये सगळे मुसलमान रोजा म्हणजेच उपवास पकडत असतात. या आयपीएलमध्ये अनेक मुस्लिम खेळाडू आहेत. त्यामधील सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान हा देखील रोजा पाळत असतो. याच राशिद खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो पाहिल्यावर तुम्हाला देखील त्याच्या सहकाऱ्यांचा अभिमान वाटेल. या रमजानच्या महिन्यात राशिद खान सोबत संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि दिग्गज फलंदाज केन विलियमसनने देखील रोजा पाळला आहे.

https://www.instagram.com/reel/CNz_sbshmP0/?utm_source=ig_embed

या व्हिडिओमध्ये राशिद खान डेव्हिड वॉर्नरला विचारतो तुम्हाला रोजा कसा वाटतो. त्यावर उत्तर देताना वॉर्नर म्हणतो रोजा खुप छान वाटत आहेत. पण हे खुप अवघड वाटत आहे. मला प्रचंड तहान आणि भूख लागली आहे. हाच प्रश्न राशिद खानने केन विलियमसनला विचारला असता त्यावर केनने, खुप छान होते. छान अनुभव घेतोय असे उत्तर दिले. सनरायझर्स हैदराबाद या संघामध्ये अनेक मुस्लिम धर्मीय खेळाडू आहेत जे रोजा पाळतात. यामध्ये खलील अहमद, राशिद, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान या खेळाडूंचा समावेश आहे. हा व्हिडिओ शेअर करताना राशिद म्हणतो, या दोन दिग्गज खेळाडूंनी माझ्यासोबत उपवास केला आहे. सध्या राशिदचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रियासुद्धा येत आहेत.