19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात आयपीएलचे सामने, ऑक्टोबर महिन्याच्या ‘या’ तारखेला होणार फायनल

0
65
ipl trophy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामधून स्थगित करण्यात आली. यानंतर आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उर्वरित आयपीएल घेण्यात येणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 10 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. अशी माहिती बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने 3 आठवड्यात संपवण्यात येणार आहे. यामध्ये 10 डबल हेडर सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या प्लॅननुसार 3 आठवडे म्हणजे 21 दिवस. या 21 दिवसात भारतीय बोर्डाचा प्लॅन, 7 सिंगल सामने, 4 प्लेऑफ आणि 10 डबल हेडर सामने घेण्यात येणार आहे.

इंंग्लंडहून युएईसाठी उड्डाण घेतील खेळाडू
भारत इंग्लंड सिरीज यांच्यातील सिरीज ठरलेल्या वेळेवर सुरू होणार आहे. हि सिरीज 4 ऑगस्टपासून सुरू होऊन, 14 सप्टेंबरपर्यंत संपणार आहे. याच सिरीजनंतर भारतीय खेळाडू तेथूनच युएईसाठी रवाना होणार आहेत. या दरम्यान खेळाडू एका बायो बबलमधून दुसर्‍या बबलमध्ये जात असल्याने त्यांना केवळ 3 दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे.

एका फ्रेंचायजीकडून वृत्ताला दुजोरा देण्यात आला
एका फ्रेंचायजीच्या अधिकार्‍याने आयपीएलच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासंबंधीचे बीसीसीआयचे पत्र मिळाले आहे. बीसीसीआयने आम्हाला टूर्नामेंटसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. आम्हाला 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यानचा वेळ देण्यात आला आहे. असे टीम अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here