हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2022 : आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात IPL 2022 चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. यासामन्यामध्ये जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल. यावर्षी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या राजस्थानने चांगली कामगिरी करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
राजस्थानला प्लेऑफमध्ये नेण्यासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी एकत्रितपणे कामगिरी केली. आजच्या सामन्यातही संजू सॅमसनला आपल्या गोलंदाजांकडून विशेषत: आर अश्विनकडून खूप आशा आहेत, कारण अश्विन हा असा गोलंदाज आहे ज्याने यापूर्वीच्या आयपीएल प्लेऑफच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत अश्विनकडून पुन्हा एकदा त्याच कामगिरीची संघाला आशा असेल.
जर आपण IPL 2022 च्या आतापर्यंच्या सामन्यांवर नजर टाकली तर अश्विनने फार प्रभावी गोलंदाजी केलेली नाही. यावेळी खेळलेल्या 14 सामन्यात त्याने 400 धावांत 11 बळी घेतले. यादरम्यान 17 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र जेव्हा प्लेऑफचा प्रश्न येतो तेव्हा अश्विन चांगलाच बहरात येतो.
आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये तीन वेळा 3-3 विकेट्स घेतलेला आर अश्विन हा पहिलाच गोलंदाज आहे. आजपर्यंत एकही भारतीय गोलंदाज अश्विनच्या या विक्रमाच्या जवळपास पोहोचू शकलेला नाही. अश्विन यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सारख्या संघांकडून खेळला आहे. यादरम्यान त्याने प्लेऑफ सामने खेळताना 3-3 विकेट घेतल्या.
गेल्या काही सामन्यांवर नजर टाकली तर आर अश्विनने फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 14 सामन्यांच्या 10 डावात 183 धावा केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तर त्याने 38 चेंडूत 50 धावा केल्या. याशिवाय त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 23 चेंडूत 40 धावांची आक्रमक खेळीही खेळली होती. यावरूनच तो चांगली फलंदाजी देखील करू शकतो हे दिसून येते. अशा स्थितीत अश्विनकडे दुर्लक्ष करणे गुजरात टायटन्सला महागात पडू शकेल. IPL 2022
IPL 2022 च्या अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.iplt20.com/
हे पण वाचा :
Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे
PM Kisan : आता घरबसल्या अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC
Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदी मध्ये घसरण
खुशखबर !!! Vi 151 रुपयांत देणार 8GB डेटा अन् Disney + Hotstar सबस्क्रिप्शन
ATS ची मोठी कारवाई : पुण्यात ‘लष्कर-ए-तोएबा’शी संबंध असलेल्या एका तरुणाला केली अटक