Wednesday, February 8, 2023

अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

- Advertisement -

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, तसंच जिल्ह्यांतील इतर भागांत कंटेन्मेंट झोन वगळून अन्य ठिकाणची दारूची दुकानं खुली करण्यात येणार आहेत.

आजपासून देशभरात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दारूपासून दूर असलेल्या लोकांनी सूट मिळताच आज सकाळपासूनच दारूच्या दुकानांपुढे रांगा लावल्या. काही ठिकाणी तर सकाळी दुकाने उघडण्याच्या दोन तास आधीपासूनच लोकांनी रांगा लावायला सुरुवात केलेली दिसली. मात्र, दुपारपर्यंत एकही दुकान न उघडल्याने रांगेत उभे असणाऱ्यांची निराशा झाली.  मद्याची दुकाने उघडण्याचे कुठलेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नसल्याने दुकाने उघडण्यास परवानगी मिळणार नसल्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागाने स्पष्ट केले होते.

- Advertisement -

दरम्यान, तळीरामांच्या हाती आज सकाळी निराशा पडल्यानंतर आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलासा दिला आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील इतर ठिकाणी मद्य विक्रीची दुकानं खुली करण्यात येणार आहेत. यासंबंधी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत. ‘जिल्ह्यातील अतिसंवेदनशील परिसर वगळून अन्य ठिकाणची मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”